Maharashtra Political Crisis Updates : Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिंदे गटाने ठाकरे सरकारविरोधात जोरदार युक्तीवाद केला. राजकीय पक्षाचे अस्तित्वच विधिमंडळ पक्षावर अवलंबून असते. नेत्याला प्रश्न विचारणे म्हणजे बंड नाही. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो. अशा स्थितीत जर पक्षनेत्याला त्यांनी सवाल विचारले तर त्यांचे चुकले कुठे? सत्ताधारी मुख्यमंत्र्यांवर जर का अविश्वास असेल तर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश देण्यात गैर काय? असे प्रश्न विचारत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच द्या, असा आक्रमक युक्तिवाद करुन शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. मागील आठवड्यातील सुनावणीत शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी शिवसेनेकडून युक्तिवाद केला होता. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे द्याच पण अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी विहित कालावधी देखील द्या, अशी मागणी करताना हरिश साळवे यांनी 2020 च्या मणिपूर केसचा दाखला दिला. संबंधित केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती महिन्यात अध्यक्षांनी निर्णय घ्यावेत, असे आदेश दिलेले होते.