Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Mumbai Rain LIVE: मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने 7,924 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Mumbai Rain Alert Today: आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजही रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. जाणून घ्या पावसाची प्रत्येक लाईव्ह अपडेट

Maharashtra Mumbai Rain LIVE: मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने 7,924 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
LIVE Blog

Maharashtra Mumbai Rain Live News: मुंबई शहरासह उपनगरं तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना गुरुवारीही पावसाने झोडपलं. गुरुवारी मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले होते. तसंच रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, आज शुक्रवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत मात्र नियमितपणे शाळा सुरु आहेत. 

 

28 July 2023
28 July 2023 15:11 PM

Monsoon Live Updates:  नांदूरमधमेश्वर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने 7,924 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे निफाड तालुक्यातील  नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर पाणी दाखल होत असल्याने पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून  नांदूर मधमेश्वर धरणाच्या दोन वक्रार गेट द्वारे 7,924 क्यूसेक पाण्याचा विसर्ग मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीत सुरू करण्यात आला आहे दारणा, गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यास नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्गात वाढ करण्यात येईल  त्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांनी नदी काठी जाऊ नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे 

28 July 2023 13:52 PM

Monsoon Live Updates: कल्याणमध्ये सकाळपासूनच तुफान पाऊस सुरु असून, अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे

 

28 July 2023 13:51 PM

Monsoon Live Updates:  चंद्रपूरमधील इरई धरण 87 टक्के भरले

चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण सुमारे 87 टक्के भरले असून धरणाची 7 पैकी 2 दारे उघडली आहेत.  2 आणि 6 क्रमांकाची दारे 0.25 मीटरने उघडली आहेत. इरई नदी चंद्रपूर शहराला वळसा घालते. खालच्या भागात पाणीपातळीत वाढीची शक्यता असून प्रशासनाने नदी काठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

इरई नदी पुढे वर्धा नदीला जाऊन मिळते. मात्र वर्धा नदीलाच महापूर असल्याने इरईचे पाणी उलट दिशेने वाहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहराच्या अनेक भागात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता असून, प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 

28 July 2023 12:05 PM

Monsoon Live Updates:  पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा 2 तासांचा ब्लॉक

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कामशेत बोगद्याजवळ पडलेली दरड काढण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 2 ते 4 थांबविण्यात येणार. 

28 July 2023 10:57 AM

Monsoon Live Updates: मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

28 July 2023 10:44 AM

Monsoon Live Updates: मुंबईतील खासगी आणि शासकीय शाळा नियमितपणे सुरु, बनावट पत्र व्हायरल

 

28 July 2023 10:04 AM

Monsoon Live Updates: विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. 

28 July 2023 10:01 AM

Monsoon Live Updates: : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत

आज कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरी तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी केला आहे.

सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा

 

28 July 2023 10:00 AM

Monsoon Live Updates: देशात 22 राज्यात रेड अलर्ट! तेलंगणामध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू

शातील अनेक भागात पावसाने (Monsoon) जोरदार हजेरी लावलेली आहे. सध्या देशातील 20 राज्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. हिमाचल, पंजाबसारख्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. गेल्या 15 वर्षांत दिल्लीत (Delhi) जुलैमध्ये एवढा पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे 22 जुलैपासून तेलंगणामध्ये (Telangana Rain) पावसामुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा

28 July 2023 09:57 AM

Monsoon Live Updates: कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी 

28 July 2023 09:33 AM

Monsoon Live Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल

 

28 July 2023 08:36 AM

Monsoon Live Updates: : रायगडात ऑरेंज अलर्ट, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर 

रायगड जिल्ह्यात दोन दिवस तुफान बॅटिंग केल्यानंतर आज पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून मधून पावसाच्या किरकोळ सरी बरसत असून आकाशात काळया ढगांची गर्दी कायम आहे. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

28 July 2023 08:35 AM

Monsoon Live Updates: गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 23 दरवाजे 2 मीटरने उघडले

मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सतत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडूंब भरली आहेत. तर गोसे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसे धरणाचे संपूर्ण 23 दरवाजे 2 मिटरने उघडण्यात आले आहेत. या 23 दरवाज्यातून 2 हजार हजार 675.55 क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असुन याचा फटका लगतच्या चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यांना बसणार आहे. 

28 July 2023 08:02 AM

Monsoon Live Updates: राज्यभरातील दहावीचा पेपर रद्द, पावसामुळे बोर्डाचा निर्णय

10 पुरवणी परीक्षा सुरू आहे. आज सामाजिक शास्त्र पेपर 1 चा पेपर होता. दरम्यान रद्द झालेला 10 वीचा पेपर 3 ऑगस्टला 11 ते 1 मध्ये होईल. 

 

28 July 2023 07:54 AM

Monsoon Live Updates: : NDRF ची 13 पथकं तैनात 

मुसळधार पावसामुळे विविध शहरांमध्ये पाणी साचलं असून पूरसदृश परिस्थिती आणि भूस्खलन होत आहे. त्यामुळे, राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांना तत्पर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

28 July 2023 07:51 AM

Monsoon Live Updates: IMD कडून यलो अलर्ट; मुंबई आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी

आज काही ठिकाणी हलक्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

28 July 2023 07:45 AM

Monsoon Live Updates: मुंबईत 223.2 मिमी पावसाची नोंद
मुंबई उपनगरांच्या तुलनेत गुरुवारी शहरात पावसाचा जोर अधिक होता. बुधवारी सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 या 24 तासांत कुलाबा केंद्रात सरासरी 223.2 मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात मुंबई उपनगरांत 145.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 

 

28 July 2023 07:38 AM

Monsoon Live Updates:  मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर लोकल उशिराने धावत आहेत. लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. 

28 July 2023 07:37 AM

Monsoon Live Updates:  शहापूर तालुक्यातील जांभे धरण ओव्हरफ्लो

शहापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असणारे जांभे धरण ओव्हरप्लो झाले असुन याठिकाणी अनेक पर्यटक धरणावरुन पडणाऱ्या पाण्याचा आंनद घेण्यासाठी येतात माञ, या ठिकाणी पर्यटनासाठी जिल्हा प्रशासनाकडुन कलम १४४ अंतर्गत मनाई हुकूम लागू करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमुड होत आहे

28 July 2023 07:36 AM

Monsoon Live Updates:  भंडारा शहरातील लाला लचपराय वार्डातील लोकांच्या घरात शिरले पाणी... नागरिक हैराण

भंडारा शहरात सायंकाळच्या सुमारास तब्बल दोन तास पावसाने जोरधार हजेरी लावत झोडपून काढले यामुळे शहरातील नाले गटार फुल्ल गच्च भरून वाहत आहेत. अश्यातच भंडारा शहरातील कित्येक वार्ड मध्ये पावसाचे पाणी साचले असून लाल बहादूर शास्त्री वार्ड येथे मुख्य मार्गावर पाणी साचल्याने नागरिकांना आवगमन करतांना नाहक त्रास होत आहे तर शहरात अनेक ठिकाणी गटार योजनेचे काम सुरू असल्याने रस्त्याची तर अक्षरशः चाळन होऊन ठीक-ठिकाणी खड्डे आहेत.आता लाला लचपराय वार्ड क्र. तीन मधील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने चक्क जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले तर आता रात्रीची वेळ असल्याने जेवण आणि झोपी जाण्यासाठी प्रश्न निर्माण झाला आहे हे मात्र विशेष..!

28 July 2023 07:35 AM

Monsoon Live Updates:  तानसा धरणाचे ६ दरवाजे उघडले,शेजारील गांवाना सतर्कतेचा इशारा.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील बृहन्मुबंई महानगरपालिकेचे तानसा धरण परिसरात पाणलोट क्षेञात संततधारे मुळे तानसा धरणाचे ३८ दरवाज्यापैकी ६ स्वयंचलित दरवाजे उघडले असुन त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील तानसा नदी लगतच्या अघई, भावसे,मोहीली,टहारपुर अदी गावांना सतर्क राहण्याचा इशारा तालुका प्रशासनाकडुन देण्यात आला आहे

28 July 2023 07:35 AM

Monsoon Live Updates:  पंचगंगा नदीची वाटचाल संथ गतीने धोका पातळीकडे. 24 तासात पंचगंगा पाणी पातळीत 5 इंचाने वाढवली.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल सुरू आहे. यापूर्वीच पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून सद्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 40 फूट 10 इंच इतकी झाली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले असून या धरणातून 8 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 तासात 5 इंचाने वाढली आहे. आजही जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर पाणी असून त्या मार्गावरील वहातुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. कोल्हापूर - गगनबावडा हा खुला झालेला राज्य मार्ग पुन्हा नदीचे पाणी आल्याने बंद झाला आहे.

28 July 2023 07:34 AM

Monsoon Live Updates:  धुळे जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही, तरी पेरण्या 93 टक्के पूर्ण

धुळे जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. पिक जगतील एवढाच रिमझिम पाऊस जिल्ह्यात बरसत आहे. जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये सर्वात बिकट परिस्थिती आहे. या ठिकाणी एकही मुसळधार पाऊस बरसलेला नाही. जिल्ह्यातील नदी नाले कोरडे ठाक पडले आहेत. जुलै महिना संपायला आला तरी मुसळधार पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तुरळ पडणाऱ्या पावसावरती पिक तग धरून आहेत. जिल्ह्यात 93 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र या पिकांना जीवनदान देऊ शकेल असा पाऊस पडत नाही. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 80 टक्के पाऊस पडला आहे. असे असले तरी जिल्ह्यात सर्वधिक कपासाची लागवड झाली आहे. 2 लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली असून, यातील बहुतांश पिकं करपायच्या स्थितीत आहे. कपासा सोबत शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन पिकांनाही पसंती दिली आहे. जिल्ह्यात अजूनही 70 पेक्षा अधिक विहीरिंचे अधिग्रहण करण्यात आले आहे. असे असले तरी कृषी विभाग मात्र सर्व आलबेल असल्याचा दावा करीत आहे.

Read More