Maharashtra SSC 10th Result 2024 LIVE Updates: शालेय जीवनाचा टप्पा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकण्याचा आणखी एक टप्पा म्हणजे इयत्ता दहावीचा निकाल. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांच निकाल आज (27 मे 2024) लागणार आहे.
अधिकृत माहितीनुसार दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तर, सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निकालाबद्दल माहिती देतील. ज्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट दहावीचा निकाल पाहता येईल.
पुणे - 10
नागपुर - 1
संभाजी नगर - 32
मुंबई - 8
कोल्हापूर - 7
लातूर - 123
कोकण - 3
राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला असून, या निकालाची आकडेवारी आहे 99.45%. तर, सर्वात कमी निकाल
वर्धा जिल्ह्यात लागला असून, या निकालाची आकडेवारी आहे 92.02 %.
2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान राज्यातील 9382 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
पुणे - 96.44 टक्के
नागपुर - 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर - 95.19 टक्के
मुंबई - 95.83 टक्के
कोल्हापूर - 97.45 टक्के
अमरावती - 95.58 टक्के
नाशिक - 95.28 टक्के
लातूर - 95.27 टक्के
कोकण - 99.01 टक्के
नेहमीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा दहावीच्या परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, उत्तीर्ण मुलींची टक्केवारी आहे 97.21 टक्के. तर, मुलांचा निकाल आहे, 94.56 टक्के. यंदाच्या परीक्षेत 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.01 टक्के इतका लागला आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून, नागपूरचा निकाल 94.73 टक्के इतका लागला आहे.
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/
72 विषयांसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा आठ माध्यमांमधून घेण्यात आली होती. नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातील 15,60,154 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा.
इयत्ता दहावीचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आला असून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिक्षण मंडळांच्या अध्यक्षांनी हा निकाल जाहीर करत राज्यातील संपूर्ण आकडेवारी समोर आणली. राज्यातील यंदाचा दहावीचा निकाल 95.81 टक्के.
इयत्ता अकरावीसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला 24 मे 2024 पासून सुरुवात झाली असून, सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रवेशप्रक्रियेला आणखी वेग मिळणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात आली आहे.
2023 -2024 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांच्या वतीनं ही परीक्षा घेण्यात आली होती.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटना भेद द्या
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/
सोमवारी सकाळी 11 वाजता बोर्डाच्या पत्रकार परिषदेदरम्यान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष इयत्ता दहावीचा राज्यातील निकाल जाहीर करतील. ज्यानंतर दुपारी 1 वाजता निकाल सर्व संकेतस्थळांवर उपलब्ध असेल. चार ते पाच संकेतस्ळथळांवर निकाल उपलब्ध असेल.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.