Todays Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत नेमकं काय सुरुय? देश स्तरावर दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी सुरू असणाऱ्या कारवाईला नेमकं कोणतं वळण मिळतंय? तुमच्या जिल्ह्यापासून तुमच्या शहर आणि गावखेड्यापर्यंत ते अगदी तुमच्या देशात नेमकं काय सुरुय? सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर.... पाहा LIVE Updates....
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या प्रकल्पाचा (17.50 किमी) अविभाज्य घटक असलेल्या कुर्ला उड्डाणपुलाच्या बांधकामात जानेवारी 2024 ते एप्रिल 2025 दरम्यान प्रगती झाली आहे. कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे (10.1 किमी) नवीन रेल्वे मार्ग टाकणे आणि कुर्ल्यापुढील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.
लाडकी बहीण योजनेचा फटका जिल्हा नियोजनला बसत नाही, असे अजित पवार म्हणाले. ते बीड दौऱ्यावर होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आम्ही सर्वजण निर्णय घेऊ. इथून पुढच्या दौऱ्यात सर्वसामान्याला कुणालाच त्रास होताच कामा नये, याच्या सूचना जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेबाबत मी चर्चा केल्याचे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी आज भावना घाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज उपाध्यक्ष पदाच पत्र भावना घाणेकर यांना देण्यात आले. यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. घाणेकर यांच्यावर या आधी महिला विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
शेतकऱ्यांकडे सी-बिल मागू नका, हे वारंवार सांगितले, तरी तुम्ही मागता. त्यावर तोडगा काढा, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही अशा बँकावर FIR पण केले. पण तुम्हालाच हे गांभीर्याने घ्यावे लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा स्पष्ट केलंय की, 'जर कोणती बँक शाखा सी-बिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल'. असा निर्णय मला आज हवाय असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ॲक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकांना फटकारले.
वन नेशन वन इलेक्शनबाबतही संसदीय संयुक्त समितीसोबत राजकीय पक्षांची बैठक झाली.ज्या दिवशी निवडणूक आयोग राष्ट्रपतींना निवडून आलेल्या खासदारांची यादी सूपुर्त करुन राष्ट्रपती त्याचे गॅझेट तयार करतील तेव्हा नवी लोकसभा अस्तित्वात आली असे म्हणता येईल.राजकीय पक्षांच्या गणितामुळे विधानसभा/ लोकसभा अस्तित्वात येण्यास ऊशीर लागु नये अशी शिफारस आम्ही केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुंबईत विधानभवनाच्या प्रवेशद्व्राजवळ शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या प्रवेशद्वाराजवळ दाखल झाल्या आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवणयाचे कार्य करीत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. परळी आणि अंबाजोगाई येथील दौरा आटोपून अजित पवार बीडमध्ये दाखल झाले. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित आहेत. नियोजन समितीच्या बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांना संवाद साधणार आहेत.
चार दिवसा पूर्वी महाड एमआयडीसी परिसरात 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. खाऊला पैसे देतो या बहाण्याने बोलवून आरोपी विलास हुलालकर याने पिडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करीत समाज बांधव आणि ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले. महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन करीत महाड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी यांना निवेदन देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली
नवी मुंबईतील पनवेल मधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेय. महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचे औषधं देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकारणी पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला पोलीस कर्मचारीच्या तक्रारी वरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बलात्कार आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2020 साली नेरे येथे गुंगीचे औषधं टाकून लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे अर्धनग्न फोटो देखील काढून ठेवण्यात आले होते. सदर फोटो वायरल करण्याची धमकी देत तसेच लग्नाचे आमिष दाखवत मागील पाच वर्षांपासून आरोपी पोलीस उपनिरीक्षक जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. तसेच सदर आरोपीच्या आईने जातीवाचक शिवीगाळ केल्याने पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पनवेल तालुका पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, संपूर्ण Schedule विद्यार्थी व पालकांना माहिती असायलाच हवं!https://t.co/2yEs3z3Fwx
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 19, 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी रजाउल्ला निजामनी उर्फ सैफुल्लाला सिंध प्रांतातील एका हल्ल्यात मारला गेला आहे. 19 वर्षांपूर्वी 2006 मध्ये नागपूरतील संघ मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता.
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात भीषण अपघात. चरणमाळ घाटातील तीव्र वळणावर उलटला. ट्रक पलटी झाल्याने 26 रेड्याच्या घाटात पडला खच. अपघातात ट्रक मधील 35 रेड्यांपैकी 26 रेड्यांचा जागीच मृत्यू. सकाळी म्हशी आणि वासरु घेऊन ट्रक पिंपळनेर कडून गुजरात कडे जात असताना घडला अपघात. चरणमाळ घाटात च्या वळणावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रँक घाटात पलटी. अपघातात ट्रकचालक गंभीरित्या जखमी.
भारतीय संघाची Asia Cup 2025 मधून माघार? पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे मोठा निर्णय! अहवालात मोठा दावाhttps://t.co/y0YESnYpPj#AsiaCup #IndiaPakistanConflict #IndiaPakistanTensions #Cricket #bcci
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 19, 2025
आणखी एक भारतीय You Tuber पाकिस्तानची हेर? ज्योती मल्होत्रामागोमाग प्रियंका सेनापती रडारवर https://t.co/CHwdNXs0wx
You Tube च्या माध्यमातून व्लॉगिंग करणाऱ्या युट्यूबरवर तपास यंत्रणांची करडी नजर. ज्योती मल्होत्रामागोमाग प्रियंकाची चर्चा... #news #pakistan #indiapakistantension…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 19, 2025
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 3 जूनला होणार आहे. वाल्मिक कराडच्या अर्जावरील निर्णय कोर्टानं राखून ठेवलाय. आज बीडच्या विशेष कोर्टात सुनावणी झाली.
सर्व निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना 'एक पद एक पेन्शन' तत्त्वावर आधारित समान आणि पूर्ण पेन्शन मिळण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेने केला होता निर्दोष मुक्तीचा दावा. आरोपीच्या वकिलाने निर्दोष मुक्तीचा अर्ज मागे घेतला. मी निर्दोष असल्याचा दावा विष्णू चाटे याने केला होता. अखेर आज अर्ज मागे घेतला. आरोपी वाल्मीक कराड याचा अर्ज मात्र कायम. वाल्मीक कराडचा निर्दोष मुक्तीचा अर्ज कायम. वाल्मीक कराडच्या अर्जावर थोड्याच वेळात निर्णय होणार.
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर अमृतसरमधील सुवर्णमंदिर. पाकिस्ताननं रचलेला हल्ल्याचा डाव. भारतीय लष्करानं हाणून पाडला प्रयत्न. आकाश क्षेपणास्त्रांच्या मदतीनं भारतीय लष्करानं हाणून पाडला पाकिस्तानी हल्ल्याचा प्रयत्न.
मुंबईला बॉम्बने नष्ट करणार असल्याचा डायल 112 ला धमकीचा अज्ञात व्यक्तीने फोन केला. पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आणि तपासाला सुरुवात केली. मुंबई नष्ट करणार, बॉम्ब आहेत तसेच काही लोक आतमध्ये आल्याची", कॉलरची माहिती. जे जे मार्ग परिसरात एका व्यक्तीच संभाषण ऐकल्याचा कॉलरचा दावा.
राजीव सिंह नावाच्या कॉलरने डायल ११२ ला कॉल करून दिली माहिती. राजीव सिंह नावाच्या कॉलर विरोधा अफवा पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना किंवा नियंत्रण कक्षाला अशा धमकीचे फोन किंवा मेल येत असल्याने पोलिसांना त्रासदायक होत आहे. कुठलाही धोका नको म्हणू. पोलीस अशा धमकीवर कॉल वर बारीक लक्ष ठेऊन आहेत.
'हे असं काम चालणार नाही...' अजित पवारांकडून वैद्यनाथ मंदिराच्या कंत्राटदाराची खरडपट्टी https://t.co/YljYi8pvcn
अजित पवार बीड दौऱ्यावर; वैद्यनाथ मंदिराच्या कंत्राटदारांची खरडपट्टी आणि मग... #news #beed #ajitpawar— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 19, 2025
भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या तोतयाला अटक करण्यात आलीय. गौरव दिनेश कुमार या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आलीय. मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. आरोपी हवाई दलाचा वेश परिधान करून फिरत होता. तपासादरम्यान त्याच्याकडे हवाई दलाचे टी-शर्ट, कॉम्बॅट पँट, शूज, बॅजेस आणि ट्रॅक सूट आदी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचा उद्देश आणि सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो का, याचा तपास सुरू आहे.
हवामान विभागानं रायगड जिल्ह्याला पुन्हा जोरदार पावसाचा इशारा जारी करत पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट केलं. 21 मे पर्यंत इथं यलो अलर्ट तर 22 मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान इथं ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणीच नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा सहभाग असल्यामुळे अजित पवारांनी तडकाफडकी बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त केली होती. त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारणी अस्तित्वात नाही. आता अजित पवार यांनी बीडच्या पक्ष संघटना वाडीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे येत्या मंगळवारी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी अस्तित्वात येईल अशी माहिती बीडचे प्रभारी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत चर्चा होणार असल्याची देखील माहिती आहे .बीड राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी निवडताना आमदार धनंजय मुंडे यांना विश्वासात घेतलं जातं का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
रोहित शर्माच्या टॅलेंटला ओळखणारा क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड; सुनील गावस्करांचे जिवलग मित्र अन् मुंबईशी खास नातं...https://t.co/XM64NCfcTA #RohitSharma #SunilGavaskar #cricketer #passedaway
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 19, 2025
पावसानंतर पुण्याच्या भोर मधील भोर - पुणे मार्गावर झाली होती वाहतूक कोंडी. पाऊस झाल्यामुळे भोर ते भाटघर दरम्यान रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेल्या खड्यांमधून पाणी साचल्यानं यातून मार्ग काढतांना वेळ लागत असल्यानं वाहनांच्या लागल्या होत्या रांगा.
त्यामुळं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना काहीकाळ ताटकळत बसावे लागले. वाहतूक कोंडी होऊनही याठिकाणी कुठलाच वाहतूक पोलीस किंवा इतर कोणताही कर्मचारी हजर नसल्यानं, काही स्थानिक तरुणांनी रस्त्यावर उतरून काही वाहतूक सुरळीत करण्यासं हातभार लावला.
खेड येथे कार अपघातात पाच जणांचा मृत्यू. जगबुडी नदी पात्रात थेट कार कोसळली. नदीपत्रात कार कोसळल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू. तर दोघं गंभीर जखमी. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना कारचा अपघात. मुंबईहून मिरा रोड येथून देवरुख कडे जाताना कारचा झाला अपघात.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळं शहरात कोरोनाचा शिरकाव झाला का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झाल्यानं भीती आणखी वाढत आहे. मात्र संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळं झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयानं दिलं आहे.
बहुप्रतिक्षित वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गिकेवर लवकरच गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू होणार आहेत. एमएमआरडीएने त्या दृष्टीने लचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे ठाणे शहराला पहिली मेट्रो मार्गिका वर्षाअखेरीस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मेट्रो 4 ही 32.32 किमी, तर मेट्रो 4 अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून 32 स्थानके असतील. यातील पहिल्या टप्प्यात या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून 10.5 किमीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गावर 10 स्थानके असतील.
Good News! मुंबई लोकल आणखी आर्थिक बळ, महत्त्वाचे प्रकल्प आता मार्गी लागणार, प्रवाशांना होणार डबल फायदा#Mumbailocalhttps://t.co/QRR48FdF2l
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 19, 2025
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून, तो आता 18 टक्क्यांवर आलाय. दरम्यान, पावसाने वेळेवर हजेरी लावल्यास मुंबईकरांना दिलासा मिळणारेय. तसंच मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात घट होत असली तरी मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची हमी दिलीय.. मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, असं नियोजन केल्याचे पालिकेचं म्हटलंय.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी आहे. वाल्मीक कराड याच्या वकिलाकडून करण्यात आलेल्या डिस्चार्जच्या याचिकेवर युक्तिवाद होईल. तर विष्णू चाटेने लातूरहून बीडच्या कारागृहात आणण्याच्या विनंती अर्जावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. याआधीच्या सुनावणीवेळी न्यायाधीश रजेवर असल्याने कोणताही युक्तिवाद झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आज या प्रकरणात बीडच्या न्यायालयात काय होते? याकडेच लक्ष लागलंय. अकरा वाजता सुनावणी सुरु होईल.
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. 2023मध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती. तिथे पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश यानं तिची दोन जणांशी भेट घडवून आणली होती. ते दोघे जण हेरगिरी करतात. त्यापैकी एकाचं नाव शाहबाज उर्फ जट्ट रंधावा असं आहे. मात्र त्याचं खरं नाव शाकीर अली उर्फ राणा शाहबाज आहे. ज्योती मल्होत्रानं त्याचं नाव जट्ट रंधावा या नावानं मोबाईलमध्ये सेव्हे केलं होतं.
आजपासून 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. 28 मे पर्यंत प्रवेश घेता येणार. 11 ऑगस्टपासून 11वीचं कॉलेज सुरू होणार.
लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. सिंधमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला खालिद याला ठार मारण्यात आलं. भारतातील अनेक हल्ल्यांत सैफुल्ला खालिदचा हात हेता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावर. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत रमंगळवार पर्यंत नाशिकच्या भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये सुरू असलेल्या संघ वर्गात २८० स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम अवकाळी पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे तर 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार एक दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर. पंकजा मुंडे सोबत अजित पवार श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग दर्शन घेणार सकाळी 8:15 वाजता. अंबाजोगाई- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्य विभागाची नूतनीकृत इमारतीची पाहणी सकाळी 10.30 वाजता. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक. दुपारी 1.30 वाजता. बीड जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक नंतर पत्रकार परिषद सायं. 4.30 वाजता.
मुंबई -वन नेशन वन इलेक्शनच्या संयुक्त संसदीय समितीची मुंबईत बैठक
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.