MHT CET 2023 Result Live : इयत्ता बारावी आणि दहावीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या परीक्षेचे निकाल लागणार आहेत. अभियांत्रिकी अर्थाच इंजिनिअरिंग आणि मेडकल अर्थात वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, त्यांच्या भविष्याचा मार्ग इथूनच ठरणार आहे.
सोमवारी, म्हणजे 12 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता हे निकाल विद्यार्थी www.mahacet.org आणि www.mahacet.in या संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. Mobile App च्या मदतीनं उमेदवारांना सूचना, प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आणि जागा वाटपाबाबतची माहिती मिळणार आहे.
दरम्यान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या एकूण 19 प्रवेश परीक्षांपैकी 17 परीक्षा झाल्या ज्यापैकी 16 परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून त्यासाठी 9,13,016 विद्यार्थी परीक्षार्थी होते.