Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

MNS Shivsena Victory Rally LIVE : छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते काही... शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं पहिलं पाऊल विजयी मेळाव्याच्या निमित्तानं पडतंय  

MNS Shivsena Victory Rally LIVE : छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते काही... शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
LIVE Blog

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या अनेक घडामोडींपैकी एक म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधूंचा मुंबईत एकत्रित विजयी मेळावा होतोय. ठाकरे बंधुंच्या मनोमिलनामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. ठाकरे ब्रँडची जादू मुंबईत कशी चालणार हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी ही अग्निपरिक्षा असणार. या विजयी मेळाव्यात नेमकं काय घडणार? पाहा क्षणोक्षणीचे अपडेट...

05 July 2025
05 July 2025 18:49 PM

अंतरपाट दूर झाला पण दोघांमधला नवरा, नवरी कोण?; ठाकरे बंधुंच्या मेळाव्यावर नितेश राणेंची बोचरी टीका!

05 July 2025 18:38 PM

ठाकरे बंधुंच्या मेळाव्याला मराठी कलाकारांनी का फिरवली पाठ? तेजस्विनी पंडीतने सर्वच सांगितलं...

05 July 2025 16:23 PM

ठाकरे एकत्र आले ते ठिक, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण? नितेश राणेंचा टोला

राज - उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजय मेळावा झाल्यानंतर नितेश राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलंच झालं, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी लगावला. यांच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले, आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाजपला आव्हान दिलं.

05 July 2025 16:11 PM

सत्ता गेल्याचे...'; राज - उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजय मेळाव्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर

05 July 2025 15:13 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंच्या मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया 

ठाकरेंच्या मेळाव्यानंतर वाखरी येथील पालखी तळावर पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील असं म्हणत राज ठाकरे यांनी मला श्रेय दिलं याबद्दल त्यांचे आभार असंही नजरा वळवणारं वक्तव्य त्यांनी केलं. 'ठाकरेंच्या मेळाव्यात रुदालीसारखं भाषण ऐकायला मिळालं. काहीं जणांची असूया पाहायला मिळाली', असं फडणवीस म्हणाले. 

05 July 2025 15:11 PM

Uddhav Thackeray Speech: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी; उद्धव ठाकरेंनी  राज ठाकरेंसमोर केलं जाहीर

05 July 2025 15:10 PM

निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'मी आणि राज महाराष्ट्र महापालिकेपर्यंत...'

05 July 2025 15:09 PM

'....होय आम्ही गुंड आहोत,' उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं; 'तुमच्या दोन मालकांचे बूट चाटून...'

05 July 2025 15:05 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : 'धोरणात हिंदी, भाषणात मराठी'; बावनकुळेंचा टोला 

'धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही' असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 'म’ म्हणजे मराठी नव्हे, महापालिकेचा, उद्धव ठाकरेंचा खरा अजेंडा उघड! म्हणत बावनकुळेंचा टोला. 

05 July 2025 15:04 PM

मराठी विजय मेळाव्याला काँग्रेस नेते का आले नाहीत?, संजय राऊत यांनी सांगितलं खरं कारण

05 July 2025 15:01 PM
05 July 2025 13:52 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update :  त्यांची मनं इतक्यात जुळलेली नाहीत...- चिराग पासवान 

ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंकर भाजप नेत्यांनी मात्र नकारात्मक सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचाही समावेश होता. दोन्ही भाऊ (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) फक्त राजकीय हेतूनं एकत्र आल्याचं ते म्हणाले. 

05 July 2025 13:38 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : महानगर पालिकेवर ठाकरेंचीच सत्ता- प्रियंका चतुर्वेदी 

अनेकांनी प्रयत्न केले दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणुन, मात्र आज दोघेही सोबत आले. ठाकरे आपल्याला आगामी दिवसांत सोबत दिसणार आणि महानगर पालिकेवर भगवा फडकणारच- प्रियंका चतुर्वेदी 

05 July 2025 13:35 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : प्रवीण दरेकर यांची बोचरी प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या समर्थकांना एकही तिकीट उद्धव ठाकरेंनी दिलं नाही. एक पद दिलं नाही. आता आलेलं प्रेम आणि सन्मान हे पुतना मावशीचं प्रेम आहे असं वाटतंय- प्रवीण दरेकर 

05 July 2025 13:33 PM
05 July 2025 13:25 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : शरद पवार दोघांच्या एकत्र येण्याचे पुरस्कर्ते - जितेंद्र आव्हाड 

शरद पवार दोघांच्या अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे पुरस्कर्ते आहेत. म्हणूनच त्यांनी मला आणि सुप्रिया ताईंना इथे पाठवलं. आज बाळासाहेब इथे असते तर त्यांच्या डोळ्यात अश्रू असते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

 

05 July 2025 12:59 PM

Raj Thackeray in Shivsena MNS Vijayi Melava : हा प्रिमियर असेल, आजपासून सुरुवात झालेली आहे- उद्धव ठाकरे 

हा प्रिमियर असेल, आजपासून सुरुवात झालेली आहे. एकतर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही. पण, कोणी दादागिरी केली तर सहन करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय तेच सांगतो, मराठा मराठीतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कुळी, 92 कुळी, घाटी, कोकणी हे सर्व मतभेद काढून मराठी माणसाची एकजूट बांधा. - उद्धव ठाकरे 

 

05 July 2025 12:55 PM
05 July 2025 12:46 PM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: 'बटेंगे तो कटेंगे'ची आठवण करून देत उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

काहीजण म्हणतात यांचा म मराठीचा नाही, म महापालिकेचा आहे. अरे हा म महाराष्ट्राचा आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला खडसावलं. सत्ता येते आणि जाते पण एकजूट ही ताकद असते... असं म्हणत बाळासाहेबांची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 'बटेंगे तो कटेंगे'ची आठवण करून देत भाजपचं नाव न घेता त्यांनी मराठ्यांमध्येच फूट पाडल्याचा घणाघात केला. 

05 July 2025 12:39 PM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: आता आम्ही दोघं तुम्हाला फेकणार आहोत- उद्धव ठाकरे 

भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो वरवरचा विषय धरून चालणार नाही. आपण सर्वांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचं आणि फेकायचं. आता आम्ही दोघं तुम्हाला फेकणार आहोत. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मध्ये त्यांनी सुरू केलेलं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वं सोडलं. हिंदुत्वं ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा कडवट देशाभिमानी हिंदू आहोत- उद्धव ठाकरे

05 July 2025 12:27 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : 'पुन्हा हे जातीपातीमध्ये विभाजन सुरू करतील'

पुन्हा हे जातीपातीमध्ये विभाजन सुरू करतील. जातीचं राजकारण करतील असं म्हणत नाव न घेता राज ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा. जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा. अशी कधीही गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्याआपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नसतो. मार खाणारा सांगत असतो. याचा अर्थ उठसूट कोणाला मारायचं असा होत नाही; राज ठाकरेंच्या सूचना 

 

05 July 2025 12:23 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : बाळासाहेबांनी कधीच मराठी भाषेबाबत तडजोड केली नाही

तुमचा कडवटपणा तुम्ही कुठे शिक्षण घेतलं यापेक्षा जास्त तो आतमध्ये असावा लागतो. बाळासाहेबांनी कधीच मराठी भाषेबाबत तडजोड केली नाही- राज ठाकरे 

05 July 2025 12:19 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी... राज ठाकरेंचं जळजळीत वक्तव्य 

यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी आधी भाषेला डिवचून बघू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते करून पाहू असं म्हणत धाडस असेल तर महाराष्ट्र आणि मुंबईला हात घालून दाखवावं... मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ... ; राज ठाकरे यांनी ठाकरी शैलीतच सरकारला सुनावलं. 

05 July 2025 12:14 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : 'तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर'

तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं. एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिली, दादा भुसे आले. म्हणे आम्ही काय म्हणतो समजून आणि ऐकून तर घ्या. मी म्हटलं मी ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये तिसरी भाषा लादताय. कुठून त्रिभाषा सूत्र आणलं? त्रिभाषा सूत्र आणलं ते म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या दुव्यासाठी. आज कोर्टात जा, बँकेत जा, कुठे आहे त्रिभाषा सूत्र? केंद्राच्या धोरणात नाही, इतर कोणत्या राज्यात नाही.... महाराष्ट्रात प्रयोग करायला पाहिजे... महाराष्ट्र ज्या वेळी पेटून उठतो त्यावेळी काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली? राज ठाकरे यांचा खडा सवाल. 

 

05 July 2025 12:10 PM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Update : फडणवीसांचं नाव घेत काय म्हणाले राज ठाकरे? 

20 वर्षानंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो. जे माननीय बाळासाहेबांना अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचं देवेंद्र फडणवीसांना जमलं. - राज ठाकरे 

05 July 2025 12:05 PM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: हीच ती वेळ हाच तो क्षण.... 

अखंड महाराष्ट्राला प्रतीक्षा असणारा तो क्षण अखेर आला आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी माय मराठीसाठी एकत्र येत विजयी मेळाव्यात हजेरी लावल व्यासपीठावर कडकडून मिठी मारली. 

 

05 July 2025 11:57 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा 

कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर व्हीआयपी रुममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच चर्चा. व्यासपीठावर येण्याआधी साधला संवाद. 

05 July 2025 11:47 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: ठाकरे बंधू कार्यक्रमस्थळी दाखल 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही आपल्या कुटुंबांसह कार्यक्रमस्थळी दाखल. समर्थकांमध्ये एकच जल्लोष. 

05 July 2025 11:37 AM
05 July 2025 11:31 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: अमित ठाकरे डोममध्ये दाखल

अमित ठाकरे डोममध्ये दाखल. जितेंद्र आव्हाडसुद्धा विजयी मेळाव्यात हजर. किशोरी पेडणेकर व इतर महिला फुगड्या घालतायत. महिला पदाधिकारी स्टेजसमेर येऊन नाचण्यास सुरुवात. 

05 July 2025 11:26 AM
05 July 2025 11:22 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: ठाकरे बंधू विजयी मेळाव्यासाठी रवाना 

उरली फक्त काही मिनिटं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे विजयी मेळाव्यासाठी रवाना. शिवतीर्थहून राज ठाकरे आणि मातोश्रीहून उद्धव ठाकरे वरळी डोमच्या दिशेनं रवाना

 

05 July 2025 11:17 AM
05 July 2025 11:17 AM
05 July 2025 11:17 AM

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं

05 July 2025 11:12 AM
05 July 2025 11:09 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: विजयी मेळाव्याच्या ठिकाणी तुडूंब गर्दी 

मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून प्रवेशपत्रिका नसलेल्या कार्यकर्त्यांकडून आत जाण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली जातेय. प्रचंड गर्दी पाहता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

05 July 2025 11:06 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: चेंबूर अणुशक्ती नगर मध्ये मनसैनिकांनी उभारल्या गुढ्या

मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होत आहे. या साठी मुंबई मधून मनसैनिक कार्यक्रमस्थळी रवाना होताना दिसत आहे. या वेळी मराठी साज आणि मराठी सण उत्सवाला या मेळाव्याशी जोडले जात आहे. चेंबूर मध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मनसैनिक मेळाव्याला निघाले आहेत. या वेळी हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे बांधून वाजत गाजत मनसैनिक आनंद व्यक्त करीत आहेत.एकोणीस वर्षानंतर हा क्षण आला आहे जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर येणार आहे, हा आमच्या साठी आनंदाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया या. वेळी मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी दिली आहे. 

 

05 July 2025 10:52 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: प्रमुख नेते वरळी डोममध्ये पोहोचण्यास सुरुवात 

संजय राऊत वरळी डोम इथं पोहोचले. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेसुद्धा वरळी डोम इथं पोहोचणार. अनिल परब आणि राऊतांमध्ये चर्चा... 

05 July 2025 10:49 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: प्रमुख नेते वरळी डोममध्ये पोहोचण्यास सुरुवात 

संजय राऊत वरळी डोम इथं पोहोचले. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेसुद्धा वरळी डोम इथं पोहोचणार. अनिल परब आणि राऊतांमध्ये चर्चा... 

05 July 2025 10:46 AM
05 July 2025 10:39 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: आवाज मराठीचा! व्यासपीठावर फक्त ठाकरे बंधूच...

विजयी मेळाव्यामध्ये व्यासपीठावर कोण असेल याचीच उत्सुकता असताना अखेर महत्त्वाची माहिती समोर आली असून, व्य़ासपीठावर दोनच खुर्च्या राहणार असून तिथं फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच असतील असं सांगण्यात येत आहे. 

05 July 2025 10:37 AM
05 July 2025 10:37 AM
05 July 2025 10:34 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: विजयी मेळाव्याचा कार्यक्रम कसा असेल? 

संजय राऊतांनी सांगितलं आहे की, "या कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट आहे. मराठी जनतेला उद्धव आणि राज ठाकरे हे दोन नेते भाऊ यांना पाहायचं आहे. मराठी माणसाला, महाराष्ट्राला त्यांनी दिशादर्शन करावं अशी जनतेची इच्छा आहे. सर्वांना मिळून हे दृश्य पाहायचं आहे. 11.30 वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल. गाण्याचा वैगेरे कार्यक्रम होणार नाही. हजारो लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. राज्यगीत वाजवलं जाईल. वरळीतील कोळी बांधवांचं बँड पथक आहे. त्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन आणि जल्लोष होईल. जर इतर पक्षांचे कोणी प्रमुख नेते आले तर त्यांनाही मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित करु. अजित भुरे सूत्रसंचालन करतील. सर्वात शेवटी एकत्रित उद्धव, राज यांना आमंत्रित केलं जाईल आणि या दोघांनी महाराष्ट्राला मराठी माणसाला संबोधित करावं असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. सभागृहाच्या बाहेरही मोठ्या स्क्रीन लावून, हाजी अलीच्या रस्त्यापर्यंत हा सोहळा पाहता यावा याचीही व्यवस्था केली आहे".

05 July 2025 10:29 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: वरळी डोम परिसरात प्रचंड उत्साह... 

वरळी डोम परिसरामध्ये प्रचंड उत्साही वातावरण आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांनी दूरवरून या कार्यक्रमासाठी हजेरी लावली असून, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि मान्यवर डोममध्ये स्थानापन्न झाले आहेत. 

05 July 2025 10:21 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: विजयी सोहळ्याचं सूत्रसंचालन कोण करणार? 

आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत आवाजाचे जादूगार अजित भूरे. सोहळ्याची शान वाढवण्यासाठी वरळी गांवच्या ब्रास बॅन्ड पथकाचीही हजेरी. 

05 July 2025 10:17 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: विजयी मेळावा म्हणजे मराठीची सुरेख झलक 

ब्रास बँड, लेझिम, दिंडी, गोविंदा पथक, गुढी पाडवा, कोळी बांधवांची उपस्थिती असा सुरेख सोहळा ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात पाहायला मिळत आहे. 

05 July 2025 10:14 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: हा परमोच्च आनंदाचा क्षण...

'हा परमोच्च आनंदाचा क्षण माननीय शिवसेनाप्रमुख असताना घडला असला तर मोठा आनंद असता, पण साहेब तिथूनही पाहत असतील. बाळांनो याचसाठी केला होता अट्टहास... आलात एकत्र', असं म्हणत अरविंद सावंत यांनी बाळासाहेबांना वंदन करत आपला आनंद व्यक्त केला. मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर शाब्दिक वार केला. 

 

05 July 2025 10:10 AM

'महाराष्ट्रात विषासारखा पसरलेला गुजरात फॉर्म्युला रोखायचा असेल तर...', मेळाव्याआधीच हल्लाबोल; शाहांचाही उल्लेख

05 July 2025 10:10 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: जय जवान गोविंदा पथकाची सलामी 

वरळी डोमबाहेर जय जवान गोविंदा पथकानं अतिशय उत्साहात सात थरांचा मानवी मनोरा रचत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी कमाल सलामी दिल्याचं पाहायला मिळालं.  

05 July 2025 09:59 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला कलाविश्वाचा पाठिंबा 

कलाकार प्रत्येकवेळी भूमिका मांडत असतात. मराठी कलाविश्वातून मराठी भाषेसोबत प्रत्येकजण उभा आहे, प्रत्येकजण उत्सुक आहे, असं म्हणत अभिनेता सिद्धार्थ जाधवनं प्रतिक्रिया दिली. त्याचा उत्साह चेहऱ्य़ावर पाहण्याजोगा होता. तर, आपण इथं यायलाच हवं ना... असं म्हणत अभिनेते भरत जाधव यांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. आज नो झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा... यातच सर्वकाही आलं असं म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं  ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. 

 

05 July 2025 09:58 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: राज ठाकरेंनी घेतली सोहळ्याच्या नेपथ्याची जबबादारी 

ठाकरे बंधूंच्या विजयी सोहळ्य़ासाठीच्या संपूर्ण नेपथ्य़ाची जबबादारी घेतल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी झी24 तासशी संवाद साधताना दिली. राज ठाकरेंच्या दृष्टीत प्रचंड सूक्ष्मता असून ती आजच्या सोहळ्यामध्ये दिसत असल्याचं ते म्हणाले. 

05 July 2025 09:33 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: प्रकाश महाजन यांची विजयी मेळाव्यावर उत्फूर्त प्रतिक्रिया 

प्रकाश महाजन यांनी झी 24तासशी संवाद साधताना ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. 'राज ठाकरेंची आपल्या मनात प्रतिमा आहे. बाळासाहेब हयात असताना शिवसेना सोडायची त्यासाठी धाडस लागतं. आमच्या वयात अंतर असलं तरीही त्यांची एक प्रतिमा माझ्या मनात आहे. आम्ही मराठीचा आग्रह धरतो याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा द्वेष करतो असं नाही.' 

05 July 2025 09:31 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: विजयी सोहळ्यावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया 

'आम्ही संघर्ष केला, सरकारनं माघार घेतली आणि त्या विराट मोर्चाच रुपांतर विजयी मेळाव्यात झालं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कालपासून इथं लोकं येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील मराठी जनतेला राज आणि उद्धव ठाकरे यांनी मंचावर एकत्र येऊन मराठी माणसाला दिशादर्शन करावं अशी आम्हा सर्वांची भूमिका आहे. हे दृश्य आता महाराष्ट्राला पाहता येईल', असं संजय राऊत म्हणाले. 

05 July 2025 09:21 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: मान्यवर कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास सुरुवात 

वरळी डोम येथे होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी विविध पक्षांसह ठाकरे समर्थक आणि मान्यवर पोहोचण्यास सुरुवात. दूरवरचे कार्यकर्ते ते मोठे नेते... कार्यक्रमस्थळी येणाऱ्यांची गर्दी होण्यास सुरुवात. सर्व कामं सुनियोजित पद्धतीनं सुरू. 

05 July 2025 09:16 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं ही अतिशय सुंदर भावना- सतीश वळंजू

'राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं ही अतिशय सुंदर भावना आहे. जे घडलं त्यात माझा खारीचा वाटा आहे याचा सार्थ अभिमान. शशी सावंत, दीपक भोसले, अरविंद पावसकर ही मंडळी आज आपल्यात नाहीत. आमच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर व्यक्तही झालो नाही. आमच्यात जी एकजूट होती तिच आता मराठी माणसानं दाखवावी...' असं अतिशय भावनिक स्वरात सतीश वळंजू झी 24 तासशी संवाद साधताना म्हणाले. 

05 July 2025 09:05 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: आज वरळी डोममध्ये एकही इतर भाषिक कर्मचारी नसणार

आज वरळी डोममध्ये एकही इतर भाषीक कर्मचारी नसणार. वरळी डोम मध्ये नेमलेले सुरक्षारक्षक ; इतर सर्व कर्मचा-यांना मराठी भाषा येणे ही अट बंधनकारक. आज वरळी डोममधील सर्व कर्मचा-यांची नेमणूक ही मराठी जनांचीच करण्यात आली आहे. ज्यांची मातृभाषा मराठी नाही त्यांना आवर्जून मराठी बोलता येते का हे विचारले गेले असून त्यानंतरच त्यांची नेमणूक करण्यात आलीय. 

05 July 2025 09:02 AM

05 July 2025 08:54 AM
05 July 2025 08:53 AM
05 July 2025 08:52 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: मराठी भाषेला कोणी दुय्यम दर्जा दिला तर...

मराठी भाषेला कोणी दुय्यम दर्जा दिला तर त्यांना त्यांच्या भाषेत धडा शिकवला जाईल. मनसे कार्यकर्त्यांचा इशारा. राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानुसार मराठीचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही अशीच भूमिका मनसैनिकांनी मांडली आहे. 

05 July 2025 08:48 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: ठाण्यात शिवसैनिक व मनसैनिक जमायला सुरुवात..

ठाणे शहराच्या वेशीवर राज उद्धव यांचा विजय असो मराठी भाषेचा विजय असो कार्यकर्त्यांकडून लगावण्यात येत आहेत घोषणा. थोड्याच वेळात कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना याचाच आढावा घेत त्यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी.

05 July 2025 08:40 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: कधी होणार भाषणांना सुरुवात? 

प्रकाश शेडगे,सुप्रिया सुळे,राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे होतील. काँग्रेसचे कुणी मोठे नेते आले तरी त्यांचेही भाषण होईल. ठाकरेंच्या या विजयी मेळाव्यात मेळाव्यात चार ते पाच जणांची भाषणे होतील. 11.30 वाजता या भाषणांना सुरुवात होईल. 

05 July 2025 08:29 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी व्यासपीठ सज्ज... 

व्यासपीठावर दिसणारं प्रत्येक दृश्य लक्षवेधी. विजयी मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात... 

05 July 2025 08:21 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: कार्यक्रमस्थळी पोहोचले बाळा नांदगावकर 

प्रत्येक व्हीआयपी रुममध्ये जाऊन बाळा नांदगावकर यांनी केली पाहणी. बॅकस्टेजपासून फ्रंट स्टेजपर्यंत नेत्यांची पाहणी. खुर्च्यांची व्यवस्था. व्यासपीठावर कोण बसणार याबाबत मात्र उत्सुकता कायम... 

 

05 July 2025 08:11 AM

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: मुलुंड चेकनाक्यावरून अनेक वाहनं मुंबईच्या दिशेनं रवाना 

मुलुंड चेकनाक्यावरून ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं अनेक ठाकरे समर्थक मुंबईच्या दिशेनं रवाना. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून 'चलो मुंबई'चा नारा. मुंबईतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला गर्दी होणार. 

 

05 July 2025 08:02 AM

 

MNS Shivsena UBT Vijayi Melava Mumbai LIVE Updates: शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष काढावा- मुनगंटीवार 

शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष काढावा, असं म्हणत मुनगंटीवारांकडून विजयी मेळाव्यावर वक्तव्य. दोन्ही भावांनी एकत्र यावं, एकत्र राहावं. आवश्यक असेल तर दोन पक्षांचा एक पक्ष करावा. आमच्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले. 

05 July 2025 07:45 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: वरळी डोम इथं कडेकोट सुरक्षा व्यवस्था 

वरळी डोममध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कडेकोट सुरक्षाव्यवस्था. बॅाम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाकडून संपूर्ण परिसरात तपासणी. 

 

05 July 2025 07:42 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: खास दिवसासाठी संदीप देशपांडे यांचा खास लूक 

हा दिवस साजरा करण्यासाठीच हा टीशर्ट बनवून घेतला असल्याचं संदीप देशपांडे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. त्यांच्या या टी शर्टवर मराठीतील बाराखडीपासून महाराष्ट्राचं चिन्हं आणि मराठीचा आवाज असं ठळक शब्दांत लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

05 July 2025 07:39 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: विजयी मेळाव्यासाठी आसनव्यवस्था अतिशय खास

आसनव्यवस्था अतिशय खास. विशेष निमंत्रितांनाही विशेष स्थान. माध्यम प्रतिनिधींसाठीही विशेष व्यवस्था. मराठीला प्राधान्य हा एकच मुद्दा डोम परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरक़डून स्पष्ट होत आहे. आसनव्यवस्थेच्या पाठीमागे वरील गॅलरीमध्ये कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये कोण येतं कोण येत नाही, याकडे राज ठाकरेंचं लक्ष राहणार असून, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी विशेष आसनव्यवस्था. व्यासपीठासमोर राजकीय पक्षातील नेत्यांना प्राधान्य. 

 

05 July 2025 07:36 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: नेत्यांनी घेतला मेळाव्याच्या तयारीचा आढावा 

वरळीतील विजयी मेळाव्याची तयारी पूर्ण...आदित्य ठाकरे, संजय राऊतांसह मनसे नेत्यांकडून रात्री तयारीचा आढावा, आता ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे लक्ष

 

05 July 2025 07:31 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: पहिलं भाषण कोणाचं? 

विजयी मेळाव्यात पहिलं भाषण राज ठाकरेंचं तर शेवटचं भाषण उद्धव ठाकरेंचं होणार असल्याची माहिती, तर इतर पक्षप्रमुखांनाही संधी मिळणार असल्याचे संकेत

 

05 July 2025 07:22 AM
05 July 2025 07:19 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: त्रिशक्ती एकत्र येणार, तिसरी शक्ती नेमकी कोण? 

ठाकरे बंधू एकत्र येणार असून विजयी मेळाव्याच्या निमित्तानं दादर, शिवसेनाभवन परिसरात विविध पद्धतीनं बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मात्र त्रिशक्ती समीकरण जुळणार अशा आशयाचा बॅनर सेनाभवन परिसराबाहेर असल्यानं हा तिसरा पक्ष किंवा ही तिरसी शक्ती नेमकी कोण हाच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. 

05 July 2025 07:13 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: कसं आहे विजयी मेळाव्याचं व्यासपीठ? 

कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा हाच या विजयी मेळाव्याचा हेतू असून कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्षाचा वरळी डोम येथील भव्य व्य़ासपीठावर पाहायला मिळत नाही. महाराष्ट्राचा नकाशा आणि फक्त मराठीचाच मुद्दा इथं सर्वत्र पाहायला मिळत आहे. 

05 July 2025 07:09 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: विजयी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 7 वाजता काय चित्र?

 वरळी डोम इथं जय्यत तयारी. मोठ्या व्यासपीठावरून ठाकरे बंधू उपस्थितांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला संबोधणार. कोणताही झेंडा नाही, मराठी हा एकच अजेंडा... असे फलक तिथं लावले असून हळुहळू कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात. 

 

05 July 2025 07:07 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: नाशिकमधून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना 

नाशिकहून मनसेचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं निघणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. हा विजयी मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार असून महाराष्ट्रद्वेषींना ही चपराक असेल असा कार्यकर्त्यांचा सूर. हा मराठी माणसाचा विजय झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. 

05 July 2025 06:59 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: आवाज मराठीचा... 

मुंबईतील वरळी डोम परिसरामध्यचे आवाज मराठीचा... निमंत्रक राज ठाकरे आणि निमंत्रक उद्धव ठाकरे अशा दोन्ही नेत्यांच्या नावानं मराठी भाषिकांना मेळाव्यासाठीचं हक्काचं निमंत्रण देण्यात आलं आहे. 

 

05 July 2025 06:58 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: आज कोणती भाषणं गाजणार? 

ठाकरे कुटुंब तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र येणार असल्या कारणानं विजयोत्सवाच्या भाषणामध्ये हे दोन्ही बंधू नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

05 July 2025 06:51 AM

MNS Shivsena Victory Rally LIVE Updates: ठाकरेंच्या युतीचं पहिलं पाऊल 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं पहिलं पाऊल विजयी मेळाव्याच्या निमित्तानं पडतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास 21 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार असल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह. 

 

Read More