PM Modi in Nashik Mumbai Maharashtra LIVE Updates: आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर सध्या सत्ताधारी भाजप पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा विविध कार्यक्रम आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर लोकार्पण सोहळ्यांना हजेरी लावताना दिसत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याला ते प्राधान्य देत आहेत. याच धर्तीवर मोदींचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. नाशिकमधून त्यांचा हा दौरा सुरु होणार असून, इथं पंतप्रधान मोदींचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
मोदींचा नियोजित नाशिक दौरा सकाळी सव्वा अकरा वाजता सुरु होणार होता. मात्र पंतप्रधान सकाळी सव्वा दहा वाजताच नाशिकमध्ये दाखल होतील. नाशिकमध्ये पंतप्रधान रोड शो करणारेत. त्यानंतर ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदातिरावर महाआरती करतील. त्यानंतर मोदींकडून या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन होईल. नाशिकनंतर मोदी मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
PM Modi in Maharashtra LIVE : गेल्या 10 वर्षात भारतात मोठे बदल झाले. मुंबई रायगड प्रवास काही मिनिटांत होणार आहे. त्याशिवाय अटल सेतूमुळे गोवादेखील मुंबईच्या जवळ येणार आहे, असं मोदी म्हणाले.
PM Modi in Maharashtra LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले की, भगवान श्रीराम यांनी अन्याय आणि अत्याचार संपवण्यासाठी पूल बांधला होता. त्याचप्रमाणे अटल सेतूमुळे अहंकारी लोकांच्या अहंकाराचाही चक्काचूर होणार आहे. महाराष्ट्रात लोकांचा उत्साह दिसून येत असून लोक रस्त्यावर मोदींच्या स्वागतासाठी थांबल्याचं पाहिला मिळालं. इतकं प्रेम कुणाला मिळणार नाही, यामुळे विरोधी लोकांची नेहमी चिडचिड करतात आणि त्यांच्या पोटात दुखतं. पण म्हणून शासनाचं काम कधी थांबणार नाही. पंतप्रधान मोदीजी अशा प्रकारे संपूर्ण देशात विश्वासाचा पूल बांधत आहेत. त्यामुळेच हा नारा 400 च्या पुढे बळकट करणे ही त्यांच्यासह आपलीही जबाबदारी असणार आहे.
PM Modi in Maharashtra LIVE : देशाच्या विकासासाठी सागरालाही टक्कर देऊ - पंतप्रधान मोदी
PM Modi in Maharashtra LIVE : अटल सेतू आमच्या विकासाचं प्रतिक आहे - पंतप्रधान मोदी
PM Modi in Maharashtra LIVE : 'अटल सेतू'चं लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात. मोदी यांनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली.
4.40pm | 12-1-2024 Navi Mumbai.
LIVE | Laying of Foundation Stone and Inauguration of various projects at the hands of Hon. PM Narendra Modi ji@narendramodi#NarendraModi #Maharashtra #NaviMumbai #MumbaiGetsAtalSetu #Development https://t.co/eHzRDg9OZ8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 12, 2024
PM Modi in Maharashtra LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात, अटल सेतू म्हणजे गेम चेंजर ठरणार आहे.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा शिलान्यास व उद्घाटन
12-01-2024 नवी मुंबई
https://t.co/kcx1Odv9H1— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 12, 2024
PM Modi in Maharashtra LIVE : न्हावा-शेवा अटल सेतूचे उदघाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी उरणमध्ये असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जनतेला संबोधित करत आहेत. फ्लेमिंगो अभयारण्य जवळच असल्यामुळे या सेतूचा त्यावर परिणाम अशी टीका करण्यात आली होती. पण मी तुम्हाला सांगतो आता फ्लेमिंगोची संख्या वाढली आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
4.40pm | 12-1-2024 Navi Mumbai.
LIVE | Laying of Foundation Stone and Inauguration of various projects at the hands of Hon. PM Narendra Modi ji@narendramodi#NarendraModi #Maharashtra #NaviMumbai #MumbaiGetsAtalSetu #Development https://t.co/eHzRDg9OZ8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 12, 2024
PM Modi in Maharashtra LIVE : नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत ईस्टर्न फ्रीवेच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याच्या पायाभरणीसाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली.
#WATCH महाराष्ट्र: पीएम नरेंद्र मोदी ईस्टर्न फ्रीवे के ऑरेंज गेट को मरीन ड्राइव से जोड़ने वाली भूमिगत सड़क सुरंग की आधारशिला रखने और अन्य कई विकास परियोजनाओं का उद्घाटन करने के लिए नवी मुंबई में आयोजित एक सार्वजनिक कार्यक्रम में शामिल हुए। pic.twitter.com/JPW2AjJVQF
— ANI_HindiNews (@AHindinews) January 12, 2024
PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधान मोदी नवी मुंबईतील कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत. तसंच ते आता जनतेला संबोधित करणार आहेत.
VIDEO | Drone visuals of Mumbai Trans Harbour Link (MTHL) from last night. The MTHL, also known as Atal Setu named after former PM Atal Bihari Vajpayee, will be inaugurated by PM Modi later today.
(Source: Third Party) pic.twitter.com/GUDXFQEJia
— Press Trust of India (@PTI_News) January 12, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित आणि मैलाचा दगड ठरलेल्या अटल सेतूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी, 12 जानेवारी 2024 रोजी पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल उपस्थित होते. यावेळी अभियंत्यांनी या सेतूबाबतची माहिती पंतप्रधानांना दिल्याचं पाहायला मिळालं.
देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं अर्थात अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. तब्बल 22 किमीच्या या सागरी सेतूवरून आता मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आला आहे.
Historic!
LIVE | Inauguration of India’s Longest Sea Bridge’Atal Bihari Vajpayee Sewri-Nhava Sheva Atal Setu’ at the hands of Hon. PM Narendra Modi Ji@narendramodi#NarendraModi #MTHL #MumbaiTransHarbourLink #AtalSetu #MumbaiGetsAtalSetu https://t.co/81WBgzmR22
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 12, 2024
कुलाबा येथील आयएनएस शिकरा या नौदल तळावर हेलिकॉप्टरनं उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा मुंबईती नव्या सी लिंकच्या दिशेनं म्हणजेच अटल सेतूच्या दिशेनं रवाना झाला.
शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं पंतप्रधान आज लोकार्पण करतील. मात्र त्याआधीच राजकीय नाट्य रंगताना दिसतंय. ठाकरे गटाने या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय. निमंत्रण पत्रिकेत ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नाही. ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केलीय. खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत. यामधील काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती आहे. मात्र ठाकरे गट मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाहीये.
PM Modi in Maharashtra
'चांद्रयान, आदित्य एल-१ चे यश जगासमोर आहे. भारतातील प्रत्येक दुकानसमोर युपीआय आहे. अमृतकाळात देशाला अजून पुढं न्यायचं आहे, असं पीएम मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. सरकारनं १० वर्षात तरूणांना विविध संधी दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली आहे. माझा तरूणांवर सर्वाधिक विश्वास आहे असंही मोदी म्हणाले.
PM Modi in Maharashtra
देशाच्या सर्व मंदिर आणि तीर्थक्षेत्रावर स्वच्छता मोहिम राबवा असं आवाहन पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात केलं. काळाराम मंदिरात येण्याची आणि सफाई करण्याची संधी मिळाली, असंही पीएम मोदींनी सांगितलं. तसंच आज भारताची अर्थव्यवस्थात जगातील टॉप 5 मध्ये आहे. तरुणांमुळे अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली. भारत हे उत्पादनाचं हब झालंय.महाराष्ट्राच्या भूमीला मनापासून नमन करत असल्याचंही मोदींनी सांगितलं.
PM Modi in Maharashtra : नाशिकमध्ये युवा महोत्सवांच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्घाटन करण्यात आलं. आपल्या भाषणाची सुरुवात पीएम मोदी यांनी मराठीत केली. राजमाता जिजाऊंना त्यांनी मराठीत वंदन केलं. भाषणात पीएम मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय सीएम असा केला. हा दिवस युवाशक्तीचा दिवस असल्याचं मोदींना भाषणात सांगितलं
नाशिकच्या तपोवन मैदानात प्रचंड गर्दी. सभास्थळी महाराष्ट्र गीत गायनानंतर कार्यक्रमाची सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधानांचं स्वागत.
काळाराम मंदिरात भेट दिल्यानंतर आणि रामकुंडावर आरती, पूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन मैदानाकडे रवाना. इथं होणार त्यांची सभा
नाशिकमध्ये झालेल्या उत्साहपूर्ण स्वागताचा स्वीकार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल झाले. त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन आणि आरती केली असून, पुढील 23 मिनिट काळाराम मंदिरात असणार ते दर्शन घेणार आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi offers prayers at Shree Kalaram Mandir in Nashik, Maharashtra. pic.twitter.com/mADzM7rYpq
— ANI (@ANI) January 12, 2024
नाशिक ढोल- ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि पारंपरिक नृत्य सादर करत हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह ते एका रोड शोमध्येही सहभागील झाले. जिथं नागरिकांना हात उंचावर त्यांनी अभिवादन केलं आणि त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.
पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ते सभास्थळी येण्याआधी पालकमंत्री दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य सादर करत पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी तीन पावली नृत्य सादर करणाऱ्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ओझर येथील हेलिपॅडवर उतरले असून तिथं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांचं स्वागत केलं.
शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण मिळालं आहे. निमंत्रण पत्रिकेतसुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ऐनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्या वतीने निमंत्रण येऊन सुद्धा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत.
नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी पहिलेच पंतप्रधान असून, त्यांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. या दौऱ्यांमध्ये मोदींवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. या दौऱ्यानिमित्त ऐतिहासिक काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी 23 मिनिट पूजा पठण करणार आहेत. यादरम्यान पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असेल. 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा बहुमान नाशिकला मिळाला असून, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. काळाराम मंदिरात मोदी येणार असल्याने नाशिक मधील पदाधिकारी स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
इथं पंतप्रधान महाराष्ट्रातीलन नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपण अयोध्येतील राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी करणार असून त्याचा शुभारंभ नाशिकच्या काळाराम मंदिरापासून करणार असल्याचं सांगितलं. एका ध्वनिफीतीच्या माध्यामातून त्यांनी देशवासियांना हा संदेश दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध महत्वकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन आज होणार आहे. यात अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या उरण-खरकोपर रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वेची टेस्ट ड्राईव्ह घेतली. आजच्या कार्यक्रमासाठी रेल्वे प्रशासनाकडून सगळी तयारीही करण्यात आली आहे.
अटल सेतूच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पनवेल येथे मोदींची सभा होणार आहे. या सभास्थळाची पाहणी मुख्यमंत्री शिंदेंनी केली. यावेळी केलेल्या कामाचा आढावा घेतला...तसेच यानंतर प्रत्यक्ष सागरी सेतूवर जाऊनही पाहणी केली.
नाशिकमध्ये पंतप्रधानांचा रोडशो पाहायला मिळणार आहे. काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदावरीची महाआरती करतील. ज्यानंतर ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त तरुणांशी संवाद साधणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.