Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार? 5 मे रोजी होणार नावाची घोषणा

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत अस्वस्थता आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याची घोषणा  5 मे रोजी होणार आहे. 

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार?  5 मे रोजी होणार नावाची घोषणा
LIVE Blog

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत अस्वस्थता आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजकीय घडामोडींना दुसऱ्या दिवशी वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल असतील अशी जास्त शक्यता व्यक्त होत आहे. तशी चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. शरद पवार अध्यक्ष पद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. 

03 May 2023
03 May 2023 16:05 PM

अंदाज लावू नका, एक दिवस जाऊ द्या; निर्णय चांगला येईल - प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Retirement Updates : अंदाज लावू नका, एक दिवस जाऊ द्या, निर्णय आम्हीच तुम्हाला सांगू.  आज शरद पवार आले सगळे नेते त्यांना भेटले. मुंबई असताना पवारसाहेब आले नेहमीप्रमाणेच भेट घेतली. आज कोणतीही बैठक नव्हती. कोणताही नेता बैठकीला आला नव्हता. आज बैठक झाली नाही निर्णय झालेला नाही. उलट सुलट बातम्या येत होत्या. पवारसाहेब काल घेतलेला निर्णय परत घेण्याचा विचार केलेला नाही.  ते म्हणाले विचार करु द्यात्यांचा आहे.  मनात काय आहे हे स्पष्ट केलेले नाही, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पक्षात कोणीही नाराज नाही. जयंत पाटील हेही नाराज नाहीत. त्यांच्याशी बोलणे झालेय. ते एका मिटिंगला गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

03 May 2023 15:48 PM

महाराष्ट्राची लेक मोठी व्हावी - यशोमती ठाकूर

Sharad Pawar Retirement Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला नंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या आहे त्या मोठ्या झालेल्या आम्हाला नक्की आवडेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी व्हावं शेवटी शरद पवारांची लेख सुप्रियाताई आहे. त्यांच्यासमोर त्या मोठ्या झाल्या, शेवटी महाराष्ट्राची लेक मोठी झाली हे बघायला आवडेल, असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

03 May 2023 15:00 PM

शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा - आव्हाड

Sharad Pawar Retirement Updates :  शरद पवार यांनी राजीनामा परत घ्या, ही देशातील सर्व नागरिकांची इच्छा आहे. कोणत्याही प्रकारची बैठक झालेली नाही. आणखी दोन दिवस कोणत्याही प्रकारची बैठक देखील होणार नाही, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. जे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर याठिकाणी आंदोलन करत होते. त्यांना आतमध्ये बोलवण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

03 May 2023 14:32 PM

मी नाराज नाही - जयंत पाटील

Sharad Pawar Retirement Updates : आजच्या बैठकीला मला बोलावलं नाही म्हणजे त्यांना गरज वाटली नसेल, असे बोलणार जयंत पाटील यांनी आपला सूर बदला. मी नाराज नाही. सर्वांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो.अनेकांचे राजीनामे माझ्याकडे आलेले आहेत. शरद पवार यांचा मला फोन आलेला आहे. मी माझी मीटिंग संपून पुन्हा मुंबईला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तुम्ही (मीडिया) प्रश्न केला म्हणून मी तसं म्हटलं, अशी सारवासारव पाटील यांनी यावेळी केली.

03 May 2023 14:27 PM

सुप्रिया सुळे यांना देशाचं नेतृत्व दिलं तर आंनद - थोरात

Sharad Pawar Retirement Updates :  सुप्रिया सुळे यांना देशाचं नेतृत्व दिलं तर आंनदच होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचा तो पक्षांतर्गत विषय आहे. महाराष्ट्राची लेक देशपातळीवर अध्यक्ष झाली आनंद वाटेल. मात्र पवार साहेबांनी पुढच्या काळात राष्ट्रीय पातळीवर प्रवाहात सक्रिय राहील पाहिजे. भाजपचा विरोध असाच संघटित राहिला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. हा प्रश्न अंतर्गत असला तरी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा आहे. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. राजकीय निवृत्ती नाही. सोनिया व राहुल गांधींना साथ देण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका आहे. पुरोगामी विचारांची साथ कायम असावी ही आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

03 May 2023 13:44 PM

जयंत पाटील नाराज

राष्ट्रवादीच्या बैठकीवरुन बराच गोंधळ पाहायला मिळाला... वाय बीच्या बैठकीला आपल्याला निमंत्रणच नव्हतं, या बैठकीची कुठलीही कल्पना नव्हती. असं जयंत पाटलांनी म्हटलंय. ही राष्ट्रीय स्तरावरची बैठक होती, असा टोलाही त्यांनी लगावला. असं म्हणताना जयंत पाटलांचा थोडासा नाराजीचा सूर दिसला.... तर अशी कुठलीही बैठक नव्हती, असा दावा छगन भुजबळांनी केलाय.  

03 May 2023 12:03 PM

जितेंद्र आव्हाड यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा

Sharad Pawar Retirement Updates :  राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरुच । राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. आव्हाड हे पवार यांचे जवळचे आणि मर्जीतील नेते ओळखले जातात.। ठाण्यातील राष्ट्रवादीचेही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत

03 May 2023 12:01 PM

Sharad Pawar Retirement Updates : परळी शहरातील नगर परिषद रोड परिसरात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेरपाठोपाठ आता परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागलेत. या बॅनरवर खा. शरद पवार, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. धनंजय मुंडे, परळी नगर परिषदचे माजी गटनेते वाल्मिक आणा कराड यांचे फोटो देखील आहेत. बॅनरमुळे शहरात चर्चा होत आहे.

03 May 2023 11:25 AM

Sharad Pawar Retirement Updates : दिल्लीत सुप्रिया सुळे, तर राज्यात अजित पवार, असे छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

03 May 2023 11:06 AM

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पुण्यात पोस्टर
Sharad Pawar Retirement Updates :  राज्यभरात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. अशातच पुण्यातील कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकावत निवृत्ती मागे घेण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती बॅनरमार्फत केली आहे.

fallbacks

03 May 2023 10:55 AM

राष्ट्रवादी अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक

Sharad Pawar Retirement Updates :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी बनवलेल्या कमिटीची 11.30 वाजता बैठक. वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठकीचा आयोजन करण्यात आले आहे. समितीमधील बहुतेक सदस्य बैठकीसाठी उपस्थित राहतील. प्रफुल्ल पटेल हेही वाय बी चव्हाण सेंटर दाखल । अजित पवारही उपस्थित राहणार.

03 May 2023 10:52 AM

राष्ट्रवादी अध्यक्ष पदासाठी या दोन नावांची चर्चा

Sharad Pawar Retirement Updates :   शरद पवार यांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी सिद्धिविनायकाला राष्टवादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी साकडं घातले

03 May 2023 10:48 AM

धुळे शहरात आंदोलन 
Sharad Pawar Retirement Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर धुळ्यात आंदोलन । धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महात्मा गांधी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन । राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन । या आंदोलनादरम्यान शरद पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी । राजीनामा मागे घेण्याची सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मागणी

03 May 2023 10:46 AM

 चंद्रपूर जिल्ह्यातही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Sharad Pawar Retirement Updates :   शरद पवार यांच्या राजीनाम्याने व्यथित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे,  जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी यांनी प्रदेशाध्यक्ष यांना दिला राजीनामा, शरद पवार अध्यक्ष नसतील तर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील म्हणून त्यांनी राजीनामा परत घ्यावा अशी व्यक्त केली भावना

03 May 2023 10:44 AM

धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे राजीनामे

Sharad Pawar Retirement Updates :  शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे राजीनामे । जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

fallbacks

03 May 2023 10:39 AM

संगीता ठाकरे यांचा पदाचा राजीनामा 

Sharad Pawar Retirement Updates :  अमरावतीतही राष्ट्रवादी काँग्रेसचं राजीनामा सत्र । महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांचा पदाचा राजीनामा । संगीता ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्याकडे पाठवला । शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाबाबद पुनर्विचार करण्याची मागणी

fallbacks

 

03 May 2023 10:38 AM

Sharad Pawar Retirement Updates :  शरद पवार मोठे नेते आहेत. एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

03 May 2023 10:36 AM

Sharad Pawar Retirement Updates : अजित पवार यांच्या देवगिरी  बंगल्यावर कार्यकर्ते दाखल. आमदार अनिल पाटील देवगिरीवर दाखल. नवाब मलिक यांची मुलगी भेटून गेली. दत्ता भरणे अजित पवारांना भेटून गेलेत. त्याचवेळी सिल्व्हरओकवरही कार्यकर्ते यांचीही गर्दी. शरद पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरुच

03 May 2023 10:34 AM

Sharad Pawar Retirement Updates : आज सकाळी राजे्ंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मी विनंती केली आहे. पदावर कायम राहावं, आता अंतिम निर्णय ते धेतील, अशी माहिती शिंगणे यांनी दिली.

03 May 2023 10:33 AM

Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार भूमिकेवर ठाम. राजीनामा मागे घेण्याबाबत नकार घंटा  कायम - सूत्रांची माहिती । राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनधरणीनंतरही पवार भूमिकावर  ठाम असल्साचे समजते.

03 May 2023 10:28 AM

Sharad Pawar Retirement Updates : शरदचंद्रजी पवार आज  दुपारी 1.00 वाजेपर्यंत चव्हाण सेंटर येथे भेटीसाठी उपस्थित असणार आहेत. त्यांना लोकप्रतिनिधी  भेटणार आहेत. आमदार दत्ता भरणे हे सिव्हर ओक येथे शरद पवार यांच्या भेटीला. दरम्यान, शरद पवार सुप्रिया सुळे सिव्हर ओकवरुन वाय बी चव्हाण सेंटरकडे निघाले

03 May 2023 10:26 AM

Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार आज वाय बी चव्हाण सेंटर येथे सकाळी 10.30 जाणार आहेत. नियोजित गाठीभेटीसाठी पवार वाय बी चव्हाण सेंटर पोहोचत आहेत.

03 May 2023 10:23 AM

 राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आणि...

Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पवार यांचा हा निर्णय रुचला नाही. त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी तगादा लावला. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे पवारांचा उत्तराधिकारी कोण या चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांचा उत्तराधिकारी म्हटलं की प्रामुख्यानं दोनच नावं समोर होती. यात पहिले त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि दुसरं नाव त्यांचे पुतणे अजित पवार. पण अजित पवार यांनी आपल्याला यात कोणाताही रस नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव या शर्यतीतून बाहेर पडले आहे. दरम्यान, पवार यांच्यासोबत सावली सारखे राहणारे प्रफुल्ल पटेल यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांचे सगळ्याच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहे. तसेच पवार यांच्या जवळचे म्हणून पटेल ओळखले जातात. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्र सोपवली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चाही राष्ट्रवादीमध्ये सुरु आहे. त्यामुळे पटेल हेही अध्यक्ष होऊ शकतात, अशीही शक्यता आहे.

Read More