Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Sharad Pawar Resigns LIVE: शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर ठाम...सूत्रांची माहिती

Sharad Pawar Resigns Live Updates: महाराष्ट्रातले दिग्गज नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे

Sharad Pawar Resigns LIVE: शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर ठाम...सूत्रांची माहिती
LIVE Blog

Sharad Pawar Retirement Live Updates : महाराष्ट्रातले दिग्गज नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं. मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. 'जनतेचं प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे' असं शरद पवार यांनी 

02 May 2023
02 May 2023 17:51 PM

पवार दोन-तीन दिवसात निर्णय घेणार
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हजारो कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर सकाळपासून ठिय्या दिला आहे. नाराज कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याकडून मनधरणी करण्यात येतेय. शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार येत्या दोन - तीन दिवसात निर्णय जाहीर करतील अशी माहिती अजित पवारांनी दिली.

 

02 May 2023 15:57 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा दिल्यानंतर धाराशिव चे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. गेली 43 वर्ष शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने काम केले यापुढेही राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर निष्ठेने काम करणार असल्याचे पत्रात त्यांनी उल्लेख केला आहे.

02 May 2023 15:11 PM

उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार
शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सिल्वर ओक बंगल्यावर भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रफुल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेणार. सिव्हर ओक येथे संथ्याकाळी भेट आजच्या घडामोडी यावर चर्चा करणार

02 May 2023 14:18 PM

सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
क्रिकेटमध्ये अतिशय उंचीवर गेल्यावर अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हाच भाव असतो ..सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये बघितलं एक तर आपण स्वतःहून निवृत्त व्हायचं असतं अन्यथा जनता आपल्याला निवृत्त करत असते.. त्यामुळे सर्वात चांगला पर्याय म्हणजे स्वतःहून निवृत्त होणे ..जनता तेव्हा निवृत्त करते तेव्हा मनात एक मात्र भाव असते की आम्ही जनतेसाठी इतके वर्ष सेवा दिली पण जनता किंमत करत नाही ..यांचं अनुकरण अनेक लोक निश्चित अनुकरण करतील...

 

02 May 2023 14:13 PM

कायम पक्षासोबत - शरद पवार
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. निवृत्ती मागे घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांनी मागणी केली. पवारांच्या निर्णयाने उपस्थितितांच्या डोळ्यात अश्रु तरळले. यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्षात असणारच आहे, फक्त पदावर असणार नाही एवढंच म्हटलंय, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांचं ट्विट
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.

महाविकास आघाडीचं काय?
शरद पवार यांच्या निर्णयाने महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता. पवारांच्या निर्णयामुळे मविआच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह पवारांनी निर्णय मागे घ्यावा, असं शिवसेना आणि कॅाग्रेस पक्षातील नेत्यांचेही म्हणणं

नाना पटोले यांची प्रतिक्रिया
शरद पवार हे एक जेष्ठ  नेते आहे. त्यांनी का राजिनामा दिला हे सांगणे कठिण आहे. अजित दादांचा मध्यंतरी विषय येत होता, पवारांच्या निवृत्तीने महाविकास आघाडीला फरक पडणार नाही. त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या विचारसणीचा पक्ष आहे. त्यामुळे फरक पडेल असे मला वाटत नाही. कॉग्रेस एक विशिष्ट्य विचारणीचा पक्ष आहे. आम्ही लोकांच्या सेवेसाठी काम करतो सत्तेसाठी नाही.
ज्या गोष्टी झाल्या आहेत त्यावर बोलणे योग्य नाही

Read More