Shiv Sena Symbol Row Hearing Updates : आज 'व्हॅलेंटाईन डे (valentine day 2023) दिवशी शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी होत आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आजचा युक्तीवाद संपला. उद्या शिंदे गट बाजू मांडणार आहे. ज्येष्ठ वकील हरिश साळवे हे उद्या युक्तीवाद करणार आहेत.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : सध्या महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं बहुमत हे असंवैधानिक आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांवर आणलेला अविश्वासाच्या ठरावासंदर्भात किंवा 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत या दोन्हीपैकी एकावर अगोदर निर्णय घ्यायला हवा, असा युक्तीवाद कपील सिब्बल यांनी केला आहे.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : - कोर्टात वर्षानुवर्षे केस सुरु असते. या कालावधीत सरकार कालावधी पूर्ण करते, असे सांगत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला.
- संविधानिक संस्था संविधानाच्या तत्वानेच चालणार. जेंव्हा अविश्वास ठराव येतो तेंव्हा आमदारांना अपात्र ठरवता येत नाही, असे सीजेआय चंद्रचूड यावेळी म्हणाले.
- विधानसभा अध्यक्ष विरोधात अविश्वास ठराव कधी आला आणि नोटीस कधी आली हे पहावं लागेल. नबाम रेबिया केसचा घटनाक्रम एका पानावर द्यावा, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कपिल सिब्बल यांच्याकडे विचारणा केली. यावेळी सिब्बल सांगितले एका पानावर सर्व घटनाक्रम कोर्टापुढे सादर करणार.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : ज्यावेळेला 16 आमदारांना नोटीस बजावली होती त्यावेळेला विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव नव्हता. विधानसभा अधिवेशन न भरवता, तुम्ही अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव कसा आणू शकता?, असा कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.
कोणी काही म्हणाले तरी पक्ष आमचाच - खैरे
Maharashtra Political News : आमचे वकील भूमिका मांडत आहेत. जरी प्रकरण सु्प्रीम कोर्टात सुरु असले तरी आम्ही भूमिका मांडत आहोत. आमचं लक्ष तिकडे आहेच. आमची परमेश्वराला विनंती आहे, सत्याच्या बाजूने अर्थात उद्धजींच्या बाजूने निकाल लागावा. कार्यकर्ते पक्ष असतात ते काहीही म्हणाले तरी पक्ष आमचा आहे. न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास आहे, निकाल सत्याच्या बाजूने निकाल लागेल, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल यांचा युक्तीवाद
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे.
- पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही.
- विधानसभा अध्यक्ष कायम त्यांच्या राजकीय पक्षाला प्राधन्य देतात.
- अरुणाचल प्रदेश प्रकरणात आमदारांनी भ्रष्टाचाराचे पत्रं दिली होती. यावर काँग्रेसने आक्षेप घेत, हे खोटं असल्याचं सांगितलं होतं. यानंतर काँग्रेसच्या 21 आमदारांचा अपात्रतेची नोटीस बजावली होती.
- राजकीय सभ्यता राखण्यासाठी 10वी सूची दिली. पण, या सूचीचा गैरवापर होतो की काय अशी शंका?
कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत, सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : शिंदे गटाकडून नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देण्यात आला. मात्र अरुणाचलच्या राज्यपालांची भूमिका तपासावी लागेल, सिब्बल यांचा प्रतियुक्तीवाद. नबाम रेबिया प्रकरणाचे निकालपत्र पाहण्याची सिब्बल यांनी परवानगी मागितली आहे.
ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागेल अशी आशा - अंबादास दानवे
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या बाजूनं निकाल लागेल, अशी आशा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : राज्यपाल म्हणाले की तुम्ही सभागृहाची रचना बदलू शकत नाही. पण सभापतींनी 21 जणांना अपात्र ठरवले आणि उपसभापतींनी ते रद्द ठरवले असे झाले, असा सिब्बल यांनी युक्तीवाद केला. त्यावर CJI DY चंद्रचूड म्हणालेत, म्हणजे राज्यपालांनी अजेंडातील पहिला मुद्दा स्पीकरला काढून टाकण्यासाठी निश्चित केला.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : सुप्रीम कोर्टात युक्तीवादाला सुरुवात झाली असून हरीश साळवे शिंदे गटाची आणि कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत.
महाराष्ट्र सत्तासंर्षावर सुनावणी सुरु
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : महाराष्ट्र सत्तासंर्षावर सुनावणी सुरु झाली आहे. हरिश साळवे आणि कपिल सिब्बल कोर्टात दाखल झालेत.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : सुप्रीम कोर्टात सत्याचा विजय होईल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : दोन महत्त्वाच्या सुनावणी होणार आहेत, एक निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर कोर्टाने स्पष्टीकरण द्यायला हवे. आज काय होईल तर तारीख पुढे जाईल आणि 7 न्यायमूर्ती यांच्याकडे हा खटला जाऊ शकतो, असे मत कायद्याचे अभ्यासक उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
निकाल आमच्या बाजूने लागेल - उदय सामंत
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : आमची बाजू कोर्टात भक्कम आहे. यामुळे आम्हाला विश्वास आहे निकाल आमच्या बाजूने लागेल. काहीजण मात्र कोर्टावर शंका घेतात. कदाचित त्यांची बाजू कमी माहिती असावी, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव असेल तर विधानसभा अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकतात का ? यावर होणार युक्तीवाद
Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर सुनावणी । 7 बेंच जजेसकडे प्रकरण पाठवले जाणार का ? । नबम राबिया केसचा संदर्भ राज्याच्या सत्ता संघर्षाशी आहे का ? । नबम राबिया केसवर ५ जजेसनं निकाल दिला होता. नबम राबिया केसची समीक्षा करण्यासाठी 7 जजेस बेंच आवश्यक आहे का ? यावर युक्तीवाद
Shiv Sena Symbol Row Hearing Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्ट आम्हालाच न्याय देईल असा विश्वास ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केलाय.
आजच्या सुनावणीत सत्तासंघर्षाचा मुद्दा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यावर युक्तीवाद?
Shiv Sena Symbol Row Hearing Updates News : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. त्यावर दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात याचिका केल्यात. तसेच 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरतेय. आजच्या सुनावणीत सत्तासंघर्षाचा मुद्दा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यावर युक्तीवाद होणार आहे.
अपात्र आमदारांच्या संदर्भात नबम राबिया केसचा निकाल 5 न्यायाधीशांच्या बेंचने दिला होता. त्यामुळे त्या प्रकरणाची समिक्षा करायची असेल तर 7 न्यायाधीशांच्या घटनपीठाकडे प्रकरण सोपवावं लागेल अशी ठाकरे गटाने विनंती केली होती. त्यावर कोर्टाने आजची तारीख दिली होती. ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टात आज सकाळी 10.30 वाजता यावर सुनावणी होईल.
शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, आज काय होणार फैसला?
Shiv Sena Symbol Row Hearing Updates News : शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. (Maharashtra Political News) आज 'व्हॅलेंटाईन डे (valentine day 2023) दिवशी शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टात आज सकाळी 10.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. तेव्हा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळत (Maharashtra Political News) आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. त्यावर दोन्ही गटांची सुप्रीम कोर्टात याचिका केल्या आहेत. तसेच 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरत आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारकीविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिंदेंना घेरायचं, इतर 15 आमदारांना अपात्र ठरवायचं आणि सरकार अल्पमतात आणायचं अशी ठाकरेंची रणनीती आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.