Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बदलापूरमध्ये खडकी वडापावमध्ये आढळली पाल

आणखी एका वडापावमध्ये आढळली पाल

बदलापूरमध्ये खडकी वडापावमध्ये आढळली पाल

बदलापूर : अंबरनाथमध्ये बबन वडापावमध्ये पाल आढळल्याचं प्रकरण ताज असतानाच आता बदलापूरमध्ये ही वडापावमध्ये पाल आढळल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिमेकडील ओम साई स्नॅक्स कॉर्नर (खडकी वडापाव) या दुकानामधला हा धक्कादायक प्रकार आहे.

नगरपालिकेने स्नॅक्स कॉर्नर सील केलं आहे. पालिकेने दुकानाचा पंचनामा करत पुढील कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. बदलापूर पोलीस ठाण्यात स्नॅक्स कॉर्नरचा मालक हंसराज चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Read More