Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लोकसभा निवडणूक २०१९ : मावळ लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२९ एप्रिलला मावळमध्ये निवडणूक होणार आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ : मावळ लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

मावळ : मावळ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ मानला जातो. युती झाली असली तरी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. शेकापची राष्ट्रवादीला मदत मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना येथे आणखी फायदा होऊ शकतो. शिवसेनेकडून श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर बहुजन वंचित आघाडीने येथून राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. २९ एप्रिलला येथे निवडणूक होणार आहे.

२०१४ निवडणुकीचा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा मोठा पराभव झाला होता. शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल ५ लाख १२ हजार २२६ मतांनी विजयी झाले होते.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

श्रीरंग बारणे भाजप 569825
लक्ष्मण जगताप अपक्ष, शेकाप-मनसे पाठिंबा 254056
 राहुल नार्वेकर राष्ट्रवादी 93502
मारुती भापकर आप 28657
भिमापुत्र गायकवाड बसपा 14727

 

Read More