Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '...म्हणून घेतली माघार?'

Shinde group claimed For Nashik: आम्ही भुजबळांचे मनापासून आभार मानतो, असे शिरसाठ म्हणाले. 

छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '...म्हणून घेतली माघार?'

Shinde group claimed For Nashik: आगामी लोकसभेसाठी नाशिकची जागा अजित पवार गटाकडून छगन भुजबळ लढवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण आपण माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. याला काही अवधी उलटत नाही तोपर्यंत शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकच्या जागेची आम्ही मागणी केली होती आणि आमचा आग्रह पण होता. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चादेखील झाल्या. कदाचित त्यामुळे आज भुजबळ साहेबांनी स्वतः हुन माघार घेतली, असे शिरसाठ म्हणाले. 

 नाशिकची जागा आजच विजयी झाली

राज्यात असलेल्या उष्णतेमुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचे ते म्हणाले. तसेच आम्ही भुजबळांचे मनापासून आभार मानतो. याचा अर्थ असा आहे की ती जागा शिवसेनेची आणि शिवसेना ती जागा लढणार असे शिरसाठ म्हणाले.नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रह होता. मुख्यमंत्री, फडणवीस असो अजित दादा असतील त्यांच्याशी चर्चा झाल्या असतील. नाशिकची जागा आजच विजयी झाली असे म्हणायला हरकत नाही, असे शिरसाठ म्हणाले. 

संभाजी नगरची जागादेखील शिवसेनेचीच आहे.आजच संध्याकाळपर्यंत नावाची घोषणा केली जाईल. आज तिढा सुटून नावाची घोषणा होइल. कोणाच नाव येईल ते सांगण्याटा मुख्यमंत्र्यांना अधिकार पण आजचं नाव घोषित होईल असे त्यांनी सांगितले. नारायण राणे यांचा सन्मान ठेवून सर्वांनी एकएकमाताने विचार करुन ती जागा त्यांना दिली आहे. त्यांनी जो संकल्प केला आहे तो पूर्ण होईल, असे ते म्हणाले. 

राऊतांवर टीका 

महिलांना नाची म्हणणाऱ्या नाच्यांना दुसरा धंदा उरलेला नाही. नवनीत राणा याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करतीलच. आमचा पक्ष हा महिलींचा सन्मान करणारा आहे. पक्षाचा पराभव समोर दिसल्याने संजय राऊत बेताल वक्तव्य करत असल्याचा टोला शिरसाठांनी लगावला. हीच वाक्य दुसऱ्या किंवा विरोधातून कुणी बोललं असतं तर थयथयाट केला असता, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे सभा घेणार?

राज ठाकरेंच्या सभा महत्त्वाच्या ठिकाणी होणार आहेत. त्यात संभाजीनगरसाठी सभा घ्यावी यासाठी मी स्वतः त्यांना सांगितले आहे. मनसेने पाठिंबा दिल्याने सर्व कार्यकर्ते एकत्र प्रचार करताय, अशी माहितीदेखील शिरसाठ यांनी दिली. 

Read More