Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

निफाडमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे आता राज्यातला पाराही घसरू लागला आहे. आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचं तापमान आठ अंशापर्यंत खाली आलंय. 

निफाडमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

 नाशिक : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे आता राज्यातला पाराही घसरू लागला आहे. आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचं तापमान आठ अंशापर्यंत खाली आलंय. 

महाबळेश्वरमध्ये पारा 8.8 अंशावर घरसलाय. उत्तर भारतात गेल्या आठवड्याभरात तापमान सातत्यानं कमी होत आहे. गेल्या काही दिवसात त्याचा परिणाम राज्यातही दिसू लागलंय.

 आज निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. इकडे नाशिकमध्येही किमान तापमान 8.2 अंश नोंदवण्यात आलय.

Read More