Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Maha Budget Session | अभिभाषणावेळी मविआ आमदारांचा गोंधळ; राज्यपालांनी भाषण अर्ध्यावर सोडलं

Bhagatsinh Koshari | राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात गोंधळ झाला. 

Maha Budget Session | अभिभाषणावेळी मविआ आमदारांचा गोंधळ; राज्यपालांनी भाषण अर्ध्यावर सोडलं

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात गोंधळ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देण्यात आल्या. गोंधळामुळे राज्यपालांनी सभागृहातील अभिभाषण 5 मिनिटांत संपवलं. आणि राज्यपाल सभागृहातून निघून गेले.

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी 5 मिनिटात भाषण संपवले आणि विधीमंडळातून निघून गेले. राज्यपाल राष्ट्रगीतासाठीही थांबले नाहीत. हे योग्य नाही अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी भाजप आमदारांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विधिमंडळाच्या बाहेर भाजप आमदारांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमकपणे घोषणा दिल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी कथित संबधांमुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने जोरदार घोषणा दिल्या.
 

Read More