Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई

ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे. 

ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई

नागपूर : ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे. 

नुकसान भरपाईची घोषणा

विधान परिषदेमध्ये अल्पकालीन चर्चेच्या निमिताने ओखी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकात पाटील यांनी शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी ही घोषणा केली. 

शेतकरी आणि मच्छीमारांना मदत

यामध्ये मच्छीमारांच्या बोटींचं अंशतः नुकसान झालेल्यांसाठी ४ हजार १०० रुपये, बोटींच्या मोठ्या नुकसानासाठी ९ हजार ६०० रुपये, तर मच्छीमार जाळी अंशतः नुकसान २ हजार १०० रुपये, पूर्णतः जाळी नष्ट झाले असल्यास २ हजार ६०० रुपये जाहीर करण्यात आलेले आहे.

शेतक-यांनी किती मदत?

तर ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनाही त्यांनी मदत जाहीर केली आहे. कोरडवाहूसाठी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर, बागायतीसाठी साडे तेरा हजार रुपये प्रतिहेक्टर मदत, सर्व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. मात्र ही मदत तूटपुंजी असल्याचं सांगत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. 

Read More