Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'आम्हाला शिकवू नका, आपल्या आजोबांना...', 'जाणता राजा'वरुन नितेश राणे-रोहित पवार भिडले

Maharashtra Assembly Rohit Pawar Vs Nitesh Rane: रोहित पवारांचे आजोबा म्हणजेच शरद पवारांचा संदर्भ देत राणेंकडून हल्लाबोल

'आम्हाला शिकवू नका, आपल्या आजोबांना...', 'जाणता राजा'वरुन नितेश राणे-रोहित पवार भिडले

Maharashtra Assembly Rohit Pawar Vs Nitesh Rane: विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शरद पवार गाटचे आमदार रोहित पवार आणि मंत्री नितेश राणे यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना दोन्ही आमदारांमध्ये विधानसभेत खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरुन रोहित पवार बोलत होते. रोहित पवार यांनी सोलापूरकर आणि कोराटकर यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला. यावरुन हे ऐकून नितेश राणेंनी थेट रोहित पवारांचे आजोबा म्हणजेच शरद पवारांचा संदर्भ देत प्रतिसवाल केला आणि यावरुनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

नितेश राणेंचा हल्लाबोल

महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते महाराजांचा कसा अपमान करतात याचा उल्लेख नितेश राणेंनी केला. "जाणता राजा म्हणू नका असं कोण म्हणत होत आपल्या आजोबांना विचारा," असं नितेश राणे रोहित पवारांकडे पाहून म्हणाले. यावर रोहित पवारांनी पुन्हा एकदा, "राहुल सोलापूरकर आणि कोराटकरला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कोरटकर आणि सोलापूरकरवर राज्य सरकार का कारवाई करत नाही?" असा सवाल केला. त्यावर नितेश राणेंनी चौकशी सुरु असल्याचा संदर्भ देत रोहित पवारांना टोला लगावला. 

राहुल गांधी जयंतीच्या दिवशी

"मुख्यमंत्री चौकशी सुरु आहे सांगत आहेत पण महाराजांना जाणता राजा म्हणू नका हे कोण म्हणत बघा. शिवाजी महाराजांबद्दल काय बोलता? राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहतात. ते जाणता राजा कोणाला म्हणतात आम्हाला तुम्ही शिकवू नका?  महाराजांचा अपमान करणाऱ्याला हे सरकार सोडणार नाही ही आमची भूमिका आहे," असं नितेश राणेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकीन! फडणवीसांनी संतापून 'हिंमत आहे का?' म्हणत विचारले, 'नेहरुंनी...'

आम्हाला नाही आजोबांना शिकवा  

"जाणता राजा म्हणू नका असं कोण म्हणत होत आपल्या आजोबांना विचारा. आपल्या आजोबांना विचारा, आम्हाला शिकवू नका," असंही नितेश राणेंनी म्हटलं. "आपल्या आजोबांना जाऊन शिकवा. आम्हाला शिकवू नका. आमच्या देवा भाऊच सरकार महाराजांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही. जाणता राजा म्हणू नका हे हे कोण म्हणत होते पाहा," असं नितेश राणे म्हणाले. 

Read More