Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखलं; गेटवरच अडवली कार

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.   

बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखलं; गेटवरच अडवली कार

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) व त्यांची नात रेवती सुळे (Revti Sule) यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं. अर्धा तास झाल्यानंतरही त्यांनी आत सोडलं नाही  असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. प्रतिभा पवार यांच्यासह त्यांच्या नात रेवती सुळेही होत्या. आपण खरेदी करण्यासाठी आत जात असल्याचं प्रतिभा पवारांचं म्हणणं आहे. 

व्हिडीओत सुरक्षारक्षक आपल्याला आतून टाळं लावल्याचा फोन आल्याचं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. कोणाचा फोन आला असं विचारलं असता, त्यांनी सचिन वाघ असं उत्तर दिलं. 

गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या बारामतीत अनेक ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत.  यावेळी त्यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळेदेखील सोबत देत आहेत. आज या दोघी बारामती टेक्सटाईलमध्ये पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी गेटला टाळं लावण्यात आलं होतं. हा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाकडून शेअर करण्यात आला आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा आहेत. 

Read More