Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नांदेडमध्ये सापडली 1.5 कोटींची कॅश; लोखंडी पेट्यांमध्ये सापडले नोटांचे बंडल

नांदेडमध्ये  1.5 कोटींची कॅश सापडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही रोकड जप्त करण्यात आली आहे. 

 नांदेडमध्ये सापडली 1.5 कोटींची कॅश; लोखंडी पेट्यांमध्ये सापडले नोटांचे बंडल

Maharashtra Assembly Elections 2024 :  नांदेडमधील भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तपासणीदरम्यान एका चारचाकी वाहनातून 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बोलेरो टेम्पोची तपासणी करत असताना लोखंडी पेट्यांमध्ये ठेवलेले एक कोटी पाच लाख रुपये पोलिसांना आढळून आले. या रकमेबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी खुलासा मागितला पण वाहन चालक योग्य खुलासा देवू न शकल्यानं ही रक्कम पोलिसांनी जप्त केलीये. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत निवडणूक आयोगाला सुद्धा माहिती देण्यात आलीये.. पोलीस तपास करत आहेत. ही रक्कम कुठून आली, कुठे जात होती, हे कुणाची रक्कम आहे याबाबत आता पोलिसांचा तपास सुरू केला आहे

पुणे-सातारा महामार्गावर पुणे पोलिसांनी 5 कोटींहून अधिकची रोकड जप्त केली होती. कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही रोकड पकडलीय..पैसे कुठून आले याबाबत चौकशी सुरुय..आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नागपुरातील महाराजबागजवळ एका व्यक्तीकडून 7 लाख 93 हजाराची रोकड जप्त केलीय...सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एका बाईकस्वाराकडून ही रोकड पकडली.. पोलिस याबाबत अधिक तपास करतायत..

साताऱ्यातील तासवडे टोलनाक्यावर तपासणी दरम्यान 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय..  तळबीड पोलिसांनी गाडीतून रोकड जप्त केलीय..गुजरात पासिंगच्या महिंद्रा बोलेरो गाडीतून रोकड जप्त करण्यात आलीय. मात्र 15 लाखांची रोकड कुणाची आणि कशासाठी आणली जात होती याचा तपास आता पोलिस करताहेत.. 


मुंबईच्या भूलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय. पोलिसांनी रोकड घेऊन जाणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 5 जण पैशाची बॅग घेऊन जात असताना पोलिसांना संशय आला.  ही रोकड नेमकी कोणाची... कशासाठी वापरली जाणार होती याचा तपास भरारी पथक करत आहे. 
 मुंबईतील टिळकनगरमध्ये पैसे घेऊन जाणारी कार  पकडण्यात आली. पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली. पूर्णपणे रोख रकमेनं भरलेली ही कार होती. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Read More