Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आदित्य ठाकरेंचा 'हा' अवतार तुम्ही कधीच पाहिला नसेल; VIDEO पाहिल्याशिवाय तुमचाही बसणार नाही विश्वास

विधानभवनाच्या पाय-यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केलं. या आंदोलनात आदित्य ठाकरे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदारांची फिरकी घेताना दिसत होते. नेत्यांची नक्कल करताना फिरकी घेताना आदित्य ठाकरेंना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला  

आदित्य ठाकरेंचा 'हा' अवतार तुम्ही कधीच पाहिला नसेल; VIDEO पाहिल्याशिवाय तुमचाही बसणार नाही विश्वास

आदित्य ठाकरे म्हटलं तर शिवसेनेचा अतिशय सोबर आणि सुसंस्कृत चेहरा. याच आदित्य ठाकरेंचा ट्रोलर अवतार विधिमंडळात पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पाय-यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केलं. या आंदोलनात आदित्य ठाकरे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदारांची फिरकी घेताना दिसत होते. नेत्यांची नक्कल करताना फिरकी घेताना आदित्य ठाकरेंना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

विधिमंडळात शालिन सोज्वळ वावर असलेल्या आदित्य ठाकरेंचा वेगळाच अवतार विधिमंडळात पाहायला मिळाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी केलेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आदित्य ठाकरेंनी पायरीवर बसताच सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट विधिमंडळात प्रवेश करत होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी गद्दार सरकार, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. पन्नास खोक्के एकदम ओक्के ही आरोळी तर सत्ताधा-यांचीही दाद घेणारी ठरली.

जितेंद्र आव्हाड यांचं भाषण सुरु असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे तिथून निघाल्या होत्या त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी पुन्हा पन्नास खोकेंची आरोळी दिली. त्यानंतर मर्सिडीज खोक्के अशी घोषणा दिली. त्यानंतर पुन्हा मर्सिडीज एस क्लास खोक्के अशी घोषणा दिली. ही घोषणा दिल्याबरोबर नीलम गो-हे क्षणभर थांबल्या, मागं फिरल्या आणि रागात असा काही लूक दिला की आता काहीतरी होईल असं वाटत असताना त्या निघून गेल्या....

भास्कर जाधवांचं भाषण सुरु असतानाच रोहयोमंत्री भरत गोगावले तिथं आले. त्यांना लांबून पाहताच आमदार नितीन देशमुख यांनी ओम फट् स्वाहा अशी घोषणा दिली. त्यांच्या मागोमाग भास्कर जाधवांनी ओम फट् स्वाहा अशी घोषणा दिली. भास्कर जाधव खास ठेवणीतल्या घोषणा देत असतानाच आदित्य ठाकरे जागेवरुन उठले आणि त्यांनी भरत गोगावलेंची नॅपकिन नक्कल केली. 

हे सुरु असतानाच मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे पाय-या चढू लागले... पुन्हा विरोधकांना चेव चढला. या कोंबडी चोरांचं करायचं काय अशी आरोळी नितीन देशमुखांनी दिली. विरोधकांचा आवाज वाढला. या गदारोळात चायनिज, चायनिज अशी शेरेबाजी आदित्य ठाकरेंनी केली. संजय शिरसाट सभागृहातून काहीतरी कामासाठी पुन्हा बाहेर आले. विरोधकांच्या नजरेतून ते सुटले नाहीत. पुन्हा आदित्य ठाकरेंनी हॉटेल हॉटेल अशी घोषणा दिली गेली.

विधिमंडळ परिसरात अतिशय सोबरपणे वागणा-या आदित्य ठाकरेंचा ट्रोलर अवतार पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे ज्या भाषेत टीका करतील त्याच भाषेत त्याला उत्तर मिळेल त्यामुळं सत्ताधा-यांच्या टीकेचाही आदित्य ठाकरेंना सामना करावा लागणार आहे. आदित्य ठाकरेंचा ट्रोलर अवतार राजकीय पंडितांना अचंबित करणारा होता.

Read More