Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे पुरावे मिटवण्यात ठाकरे सरकाराचा सहभाग? विधानसभेत राडा; मोदींचाही उल्लेख

Maharashtra Assembly Session Sushant Singh Rajput Case: या प्रकरणावरुन दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार चर्चा झाली आणि सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे पुरावे मिटवण्यात ठाकरे सरकाराचा सहभाग? विधानसभेत राडा; मोदींचाही उल्लेख

Maharashtra Assembly Session Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबरोबरच त्याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये पुरावे मिटवण्यामध्ये ठाकरे सरकारचा सहभाग होता का? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे असं म्हटलं. यावरुन विरोधी पक्षातील आमदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टचा हवाला देत सवाल उपस्थित करत आक्षेप घेतला.

पुरावे ठाकरे सरकारने नष्ट केले का?

सुशांतसिंग रजपूतचा जिथं मृत्यू झाला तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारने लगेच का परत केला? उद्धव ठाकरे सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला का? याचा तपास परत केला पाहिजे, सुशांतसिंगचा मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची काय भूमिका आहे याची चौकशी झाली पाहिजे, असं भाजपाचे आमदार राम कदम यांनी विधानसभेमध्ये म्हटलं आहे. 

रिया चक्रवर्तीचाही उल्लेख

सुशांतसिंग रजपूत प्रकरणाबद्दल बोलताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी, "रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते आहेत," असं म्हटलं. यावरुन विरोधकांनी गोंधळ घालत राम कदम यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. नाना पटोलेंनी आपली बाजू मांडताना, "सदस्याचे नाव घ्यायचे असेल तर नोटीस द्यावी लागते. सभागृहाच्या प्रथा परंपरा आहेत. 5 वर्षापूर्वीची घटना व तिचे वडील आता पोलिसांत जातात," असं नमूद केलं. विरोधकांनी यावरुन सभात्याग केला.

मोदींचा उल्लेख करत विरोधकांचा सवाल

हे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. 5 वर्षापूर्वी काही गोष्टी  समोर आल्या नाहीत, असं शंभूराज देसाई म्हणाले. यावरुन ठाकरेंच्या पक्षाचे आमदार वरूण सरदेसाईंनी आपलं म्हणणं मांडलं. "सीबीआयने 3 वर्षे चौकशी करून त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला. सीबीआयवर तुमचा विश्वास नाही का ? सीबीआय मोदींच्या अंतर्गत येते. त्यावर विश्वास नाही का?" असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना शंभूराजे देसाईंनी, "सीबीआयचा रिपोर्ट नाकारण्याचा, फेटाळण्याचा प्रश्न नाही. कोणावर कुरघोडी करण्याचाही इरादा नाही. मात्र या प्रकरणामध्ये मयत मुलीच्या वडिलांनी यादीचा दाखल केली असून कोर्टाच्या आदेशानुसार चौकशीसंदर्भात निर्णय घेऊ" असं स्पष्ट केलं.

आदित्य ठाकरेंच्या नार्के टेस्टची मागणी

विधान परिषदेत दिशा सालियन प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार भावना गवळींनी, "निलेश ओझा नावाच्या वकिलाने जे काही आरोप केले आहेत. त्याची चौकशी केली पाहिजे. आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा," अशी मागणी केली. या प्रश्नाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, "विधीमंडळ सदस्य आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. पाच वर्ष पूर्वीचे एक प्रकरण आहे. त्या प्रकरणातील जी मुलगी आहे तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्यात येईल," असं उत्तर दिलं. 

Read More