Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात बीड पोलिसांचं का होतंय कौतुक? हरवलेला मुलगा जेव्हा 8 वर्षांनी आईच्या समोर येतो...

Beed Police News : बीड पोलिसांनी जे केलं त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय. 2017 मध्ये हरवलेला मुलाची आणि आईची भेट होते तेव्हा..., हृदयस्पर्शी असा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणत आहे. 

महाराष्ट्रात बीड पोलिसांचं का होतंय कौतुक? हरवलेला मुलगा जेव्हा 8 वर्षांनी आईच्या समोर येतो...

Beed Police News : महाराष्ट्र पोलिसांचं कायम सर्वत्र कौतुक होतं असतात. 24/7 काम, सणवार असो तरी दिवसरात्र घरदार सोडून देशाच्या सुरक्षेसाठी आणि लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. दिवसरात्र ते छोट्या मोठ्या गुन्ह्यांची उकल करत असतात. महाराष्ट्रात रोजच्या दिवसाला अनेक लहान मुलांसोबत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत बेपत्ता होत असतात. अशीच एक बेपत्ता केस प्रकरणात बीड पोलिसांना यश आलं आहे. या यशामुळे महाराष्ट्रात बीड पोलिसांची पाठ थोपटली जातेय. (Maharashtra Beed Police found a boy who went missing in 2017 and reunited him with his mother son Emotional video viral)

बीड पोलिसांचं का होतंय कौतुक?

पिंपळेनर गुरन भादवीमधील अल्पवयीन 16 वर्षीय मुलगा राजू काकासाहेब माळी 2017 मध्ये घरातून निघून गेला होता. तेव्हा राजू हा दहावीचे शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी येथे शिकायला होता. त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता. 

आईवडीलांची परिस्थिती एकदम हलाकीची होती. ते ऊसतोडी कामगार असल्याने कर्नाटक राज्यात कामासाठी गेले होते. डिसेंबर 2017 मध्ये राजू हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला. याबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटक वरून येण्यास आठ दिवस लागले. राजूचे आई वडिलांना वाटले की राजू काही दिवसात परत येईल. ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही.

अनेक वर्ष तब्बल पाच ते सहा वर्ष निघून गेली. पण राजू परत आलाच नाही, मग 2023 मधे त्याच्या आईने पोस्टे पिंपळनेरला गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा जानेवारी 2025 मध्ये AHTU ला वर्ग झाला. पीएसआय पल्लवी जाधव यांनी AHTU चा चार्ज घेतल्यावर सदर गुन्ह्याच्या फाइलचे बारकाईने अवलोकन केलं आणि तपासास सुरवात केली. राजूच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचे अश्रु आणि दुःख खूप वेदनादायक होते.

त्यानंतर राजूच्या शाळेत जावून त्याचे शिक्षकांची ही भेट घेतली आणि त्याच्या बाबत माहिती घेतली. त्यानंतर मागचे पाच वर्ष गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली. कारण सदर शिक्षकाच्या घरी राजू राहत होता, एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही? त्यांनीच राजूचे काही बरेवाईट तर केले नसेल ना असा संशय पीएसआय पल्लवी जाधव यांना आला.

मग पीएसआय पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत सर यांची भेट घेवून गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली आणि सदर शिक्षकावर संशय असले बाबत ही सांगितले. नवनीत कॉवत यांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासात LCB ची मदत घ्या. तसा आदेश त्यांनी पोनी शिवाजी बंटेवाड एलसीबी यांना दिला.

पोनी बंटेवाड सर यांनी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी पीएसआय श्रीराम खटावकर यांना आदेश दिला. त्यानंतर दोघांनी मिळून तपास सुरू केला. सदर शिक्षकाकडून काही एक माहिती मिळाली नाही. त्यानंतर पीएसआय खटावकर यांनी टेक्नीकल टीमच्या मदतीने राजूची माहिती काढली. सदर माहितीवरून राजूचे लोकेशन पुणे इथे असल्याचे समजले. त्याला शोधून विश्वासात घेवून पुण्यावरून बीडला आणले.

पीएसआय खटावकर यांनी राजूला पुढील तपासासाठी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या समोर हजर केले. त्यावेळी तिथे राजूचे आई वडील ही हजर होते. त्यांच्यासाठी ही विशेष भेट बीड पोलिसांनी घडवून आणली. आई आणि मुलाच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Read More