Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांकडून इशारा, 'त्या लाडक्या...'

लाडकी बहीण योजनेचा लाभ 14 हजार 298 पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे. 

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांकडून इशारा, 'त्या लाडक्या...'

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : गरिब महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली. इतर योजनांप्रमाणे आता या योजनेचाही गैरफायदा घेणं सुरु झालंय. लाडक्या बहिणींचे पैसे भावांनी हडपलेत. थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय.  पुरुषांना मिळालेल्या रकमेचा आकडा 21 कोटींहून अधिक आहे. या पुरुषांना योजनेत कुणी घुसवलं?,  छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला?, त्यासाठी जबाबदार कोण?, असे प्रश्नही आता निर्माण झाले आहेत.
या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला  सुरुवात केलीये. (maharashtra big news ladki bahin yojana recover money update from ajit pawar)

लाडकींचे पैसे भावांनी लाटले 

- 14 हजार 298 पुरुषांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ
- 10 महिने पुरुषांनी घेतली योजनेचे पैसे
-पुरुषांना 21.44 कोटी रुपयांचं वाटप
-योजनेच्या लाभार्थ्यांच्या छाननीत प्रकार उघड
- योजनेतील 2 लाख 36 हजार लाभार्थ्यांच्या नावांबद्दल संशय
- महिलांची नावं देऊन पुरुषांनी लाभ घेतल्याची शक्यता

सरकारने चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेचे पैसे गेल्याची टीका राष्ट्रवादी SPचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलीये. तर असं कारी झालं असेल तर कारवाई केली जाईल असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय. सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्याची पडताळणी केली असता, आणखीही गंभीर बाबी समोर आल्यात. त्यामुळे आता या अपात्र पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का? आणि हो तर कधी घेणार असा प्रश्न विचारला जातोय.

अजित पवार लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणालेत? 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ज्या गरिब महिला आहेत, त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू आहे, त्याच्यात मधल्या काळात पण तुम्ही पाहिलं, काही महिला ज्या सरकारी नोकरी करत होत्या त्यांची पण नावं आली, जसं जसं एक- एक गोष्टी लक्षात येतायेत तस-तशी आम्ही ती नावं कमी करत आहोत, या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं येण्याचं काहीच कारण नाही, जर या योजनेत पुरुषांची नावं आलेली असतील तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती, त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू, त्यांनी जर सहकार्य केलं नाही तर, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास मागे -पुढे पाहाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read More