Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Maharashtra budget 2022 : आरोग्य सुविधांबाबत अजित पवार यांच्या या मोठ्या घोषणा

Maharashtra budget 2022 :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आरोग्य सुविधांवर भर दिला आहे. राज्याचा अर्थसंकल्प 2022 सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सुविधाबाबत मोठी घोषणा केली आहे.  

Maharashtra budget 2022 : आरोग्य सुविधांबाबत अजित पवार यांच्या या मोठ्या घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आरोग्य सुविधांवर भर दिला आहे. राज्याचा अर्थसंकल्प 2022 सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सुविधाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आरोग्य सेवा पुढील तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. तशी तरतूद करण्यात आली आहे. आता यापुढे किडनी स्टोन मोफत उपचार शासकीय रुग्णालयात केल जाणार आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले.

सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधूदुर्ग भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे.
अकोला आणि बीड येथे स्त्री रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. 

- आरोग्य सेवा पुढील तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च अपेक्षित
- किडनी स्टोन मोफत उपचार पद्धत शासकीय रुग्णालयात केली जाणार
-  कर्करोग निदान 8 मोबाईल व्हॅन राज्यात सुरू केल्या जाणार आहेत

 पुण्यात 300 एकरात इंद्रायणी मेडिसिटी उभारणार

विधान परिषदेत राज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यात विविध ठिकाणी ट्रामा केअर सेंटरसाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुण्याजवळ 300 एकरांत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा असणारी देशातील पहिली सिटी असेल.

- आरोग्य सेवेवरील खर्चासाठी 3 हजार कोटींचे कर्ज हुडकोकडून घेणार 
- विविध ठिकाणी ट्रामा केअर सेंटरसाठी 100 कोटी देत आहोत
- जालना इथं प्रादेशिक मनोरूग्णालयासाठी 60  कोटी

शेतकरी वर्ग, जनावर यासाठी मोबाईल आरोग्य केंद्र 

- हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
- गोसीखुर्द यासाठी 800 कोटी निधी तरतूद 
- मृदा संवर्धन 4 हजार 700 कोटी काम केली जाणार
- जलसिंचन पुनर्जिवन कार्यक्रम आयोजित केला जाणार
- 60 हजार वीज कंनेक्शन जोडणार
- फळबाग योजना यात मसाले पदार्थ  याचा समावेश  
- मुंबई परळ पशुवैदसकीय इमारती देखभाल 10  कोटी निधी
- शेतकरी वर्ग - जनावर यासाठी मोबाईल आरोग्य केंद्र केले जाणार

Read More