Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

700 मीटर खोल दरीवर उभारणार काचेचा पूल, चीनच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प!

Malshej Ghat Skywalk: माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. कसा असेल हा पारदर्शक पूल जाणून घेऊया. 

700 मीटर खोल दरीवर उभारणार काचेचा पूल, चीनच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प!

Malshej Ghat Skywalk: अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली. त्याचबरोबर, महाराष्ट्राच्या पर्यटनवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या काही प्रकल्पांबाबतही माहिती दिली आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी माळशेज घाटातील प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. 

पाटण तालुक्यातील कोयनानगर आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेले प्रसिद्ध पर्यटनस्थळ माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. माळशेज घाटात स्कायवॉक उभारल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढणार आहे आणि पर्यटकांना वेगळा अनुभव घेता येणारा आहे. माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक हा भारतातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. 

माळशेज घाटात चीनप्रमाणेच काचेच्या व्हिविंग गॅलरीप्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्यात येईल. घाटात व्हिविंग गॅलरीचा प्रकल्प पर्यटकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळं मोठ्या संख्येने पर्यटक घाटाकडे आकर्षित होणार आहेत तसंच, स्थानिकांना रोजगाराच्या संधीदेखील प्राप्त होणार आहेत. 

माळशेज घाटात देशातील पहिला पारदर्शक पूल बांधण्यात येणार आहे. तब्बल 700 मीटर खोल दरीवर हा प्रकल्प बांधण्यात येणार आहे. 18 मीटर लांबीचा यू-शेप वॉकवे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. इतकंच नव्हे तर पारदर्शक काचेचा पूल असल्याने पर्यटकांना खोल दरीचा अनुभव घेता येणार आहे. तसंच, निसर्गसौंदर्याचा आनंददेखील पर्यटकांना घेता येणार आहे. 

माळशेज घाटाचे वैशिष्ट्ये

घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. धुक्याने झाकलेला टेकड्या, धबधबे आणि हिरवाईने नटलेले सौंदर्य प्रेक्षकांना मोहित करते. विशेष म्हणजे पश्चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत हा परिसर आहे. येथे दुर्मिळ पशू-पक्षी आढळून येतात. इथली खासियत म्हणजे 'रोहित पक्षी' इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे दरवर्षी या जलाशयात येतात. 

माळशेज घाटात कसे जावे?

पुण्याहून नारायणगाव मार्गे किंवा मुंबईहून कल्याण-मुरबाड मार्गे. 
कल्याण-शहापूर मार्गे किंवा शहापूर-किन्हवली-सरळगाव मार्गे. 
कल्याण हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे (85 किमी अंतरावर)

Read More