Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज्यात आज ७७१७ रूग्णांची नोंद, तर १०,३३३ रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत एकूण २,३२,२७७ रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आज ७७१७ रूग्णांची नोंद, तर १०,३३३ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे ७७१७ रूग्ण वाढले असून २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १०,३३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २,३२,२७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५९.३४४ % एवढे झाले आहे. 

राज्यात आज २८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के इतका आहे. आतापर्यंत झालेल्या १९,६८,५५९ चाचण्यांपैकी ३,९१,४४० (१९.८८ टक्के) चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,८५,५४५ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर ४२,७३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज एकूण १,४४,६९४ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

Read More