Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

19 सेकंद..स्टेजवर निरोपाचं भाषण देत असताना विद्यार्थिनी हसत हसत खाली पडली, धडकी भरवणारा Video Viral

Dharashiv Viral Video : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. इथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी निरोपाचं भाषण देताना अचानक बेशुद्ध पडली आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

19 सेकंद..स्टेजवर निरोपाचं भाषण देत असताना विद्यार्थिनी हसत हसत खाली पडली, धडकी भरवणारा Video Viral

Heart Attack Viral Video : सध्या सोशल मीडियावर 20 वर्षीय विद्यार्थीनीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. जिथे एका 20 वर्षीय तरुणी तिच्या महाविद्यालयातील निरोप समारंभात भाषण देताना बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना घडली तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थिनी वर्षा खरात परांडा इथल्या आरजी शिंदे महाविद्यालयात आनंदाने हसत खेळत भाषण देत होती. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मृत्यूचा हा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांची धडकी भरवत आहे. 

ऑनलाइन व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, वर्षा बेशुद्ध होऊन कोसळण्यापूर्वी हसत आणि उपस्थितांना संबोधित करताना दिसत आहे. भाषणादरम्यान वर्षा बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीने परांडा इथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, वर्षा यांच्यावर वयाच्या 8 व्या वर्षी हृदय शस्त्रक्रिया झाली होती. मात्र गेल्या बारा वर्षांत तिला कोणत्याही आरोग्य समस्या नव्हती आणि ती कोणतेही औषध घेत नव्हती. भाषणादरम्यान तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली आणि अखेर तिचा मृत्यू झाला, असा प्राथामिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. 

महाविद्यालय प्रशासनाने संपूर्ण घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आणि वर्षा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. 

हेसुद्धा वाचा - हातात हात, प्रेमाचा वर्षाव...25 व्या लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीसोबत डान्स करताना पतीचा मृत्यू; धक्कादायक VIDEO

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच अशीच एक घटना समोर आली होती. या प्रकरणात, 25 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना, पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. खरंतर, पार्टीत सगळे नाचत होते, कुटुंबातील सदस्यांनी पती-पत्नी दोघांनाही स्टेजवर बोलावले आणि त्यांना नाचायला सांगितले. नाही म्हणत नवरा-बायकोही लाजून नाचले. दरम्यान, पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि तो अचानक खाली पडला. तो काही वेळातच मरण पावला.

Read More