Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Jobs 2025 : महाराष्ट्राच्या विद्युत विभागात निघाली बंपर भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज, पात्रता काय?

Maharashtra Electricity Department Jobs : महाराष्ट्राच्या विद्युत विभागात निघाल्या बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

Jobs 2025 : महाराष्ट्राच्या विद्युत विभागात निघाली बंपर भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज, पात्रता काय?

Maharashtra Electricity Department Jobs : आजकाल नोकरी मिळणं काही सोपं राहिलेलं नाही कारण योग्य नोकरीविषयी आपल्याला काही माहिती मिळत नाही. योग्य संधी कुठे आहे याविषयी कळलं तरी अनेक गोष्टी या सहज होतात. आज आपण ITI पास झालेल्या तरुणांसाठी नोकरीच्या काय संधी आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यातही सरकारी नोकरीच्या संधीच्या शोधात असाल तर तुम्हाला योग्य ती संधी कुठे आहे कशी मिळणार याविषयी जाणून घेऊया. 

जे तरुण ITI पास झाले आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) नं 249 पदांवर भर्ती सुरु केली आहे. त्याची माहिती त्यांनी जाहिर केली आहे. ही भर्ती इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि सीओपीए सारख्या ट्रेड्समध्ये करत आहेत. तर आता जे इच्छुक कॅनडिडेट अधिकृत वेबसाइट mahadiscom.in वर जाऊन रजिस्टर करू शकता. 

कोण करू शकतं अर्ज?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोण-कोण अर्ज करू शकतं? आयटीआय (ITI) ची डिग्री असायला हवी. 

किती पदांसाठी भरती निघाली आहे?

एकूण 249 पदांसाठी ही भरती निघाली आहे. 
इलेक्ट्रिशियन - 110 पद
वायरमॅन - 109 पद
सीओपीए (COPA) - 30 पद

काय आहे वयाची मर्यादा?

अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी 18 वर्षांचा असायला हवा. तर जास्तीत जास्त 27 वर्षांचा असावा. ज्यांना आरक्षण आहे त्यांना त्यानुसार वयाच्या मर्यादेत सूट देण्यात येईल. 

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये, उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. म्हणजेच, लेखी परीक्षेची आवश्यकता नाही, परंतु शैक्षणिक गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

कागदपत्र पडताळणी तारीख

उमेदवारांची कागदपत्रे 21 ते 23 जून 2025 दरम्यान तपासली जातील. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी वेळेपूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे महत्वाचे आहे, जसे की आयटीआयचं शिक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि निवास प्रमाणपत्र. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत साइटवर पाहू शकतात. 

अर्ज कसा करावा?

स्टेप 1: अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सगळ्यात आधी mahadiscom.in वेबसाइटवर जावे.

स्टेप 2: यानंतर होमपेजवरील 'करिअर' किंवा 'अ‍ॅप्रेंटिसशिप' विभागात जा.

स्टेप 3: त्यानंतर उमेदवार भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.

स्टेप 4: आता उमेदवारांनी अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

स्टेप 5: अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंट आउट घ्या.

Read More