Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मोठा घोटाळा! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचं खत शेजाऱ्यांनी लुटलं

Maharashtra Fertilizers Scam : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नावावर या राज्यातील शेतकऱ्यांनी खतावर मारला डल्ला. मोठा घोटाळा समोर. परप्रांतीय शेतकऱ्यांवर कृषी विभागाची कारवाई.  

मोठा घोटाळा! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचं खत शेजाऱ्यांनी लुटलं

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : (Maharashtra Fertilizers Scam) राज्यात एक मोठा खत घोटाळा समोर आला असून, यात थेट मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगतच मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश मधील शेतकरी विना परवाना रासायनिक खते घेऊन जातानी कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. 

गोंदियात करण्यात आलेल्या या कारवाईत तीन मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे शहरात आढळून आले आहेत. 

भरारी पथकाने कारवाई करून तीन वाहनांची जप्ती

परप्रांतीय शेतकरी रासायनिक खते पर राज्यात घेऊन जात असताना कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून तीन वाहनांची जप्ती केली. 45 गोणी भरून असणाऱ्या या रासायनिक खताची एकूण किंमत 45 हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान कारवाईनंतर वाहन चालकांवर रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 (4) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. परप्रांतीय शेतकरी आमगाव तालुका जवळ असल्यामुळे आमगाव शहरातील रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून विनापरवाना खत खरेदी करून नेत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असे परंतु कृषी विभागाची कारवाई मात्र शून्य असायची. 

विनापरवाना खत घेऊन जाताना गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच कृषी विभागांनी केलेली कारवाई असून खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील काही दुकानदार विनापरवाना परप्रांतीय शेतकऱ्यांना खते विकतात, पण असं असतानाही या कारवाईत खतं खरेदी केलेल्या दुकानदारांवर सध्या कृषी विभागाने कोणती कारवाई केली नाही. 

रासायनिक खत विक्री केल्याची कच्ची पावती शेतकऱ्यांकडे

सदर प्रकरणात रासायनिक खत विक्री केल्याची कच्ची पावती शेतकऱ्यांकडे दिसून आली आहे. आमगाव शहराच्या टोकावर आणि अगदी सीमेवर काही रासायनिक खतांची दुकानं असून काही दुकानदार परप्रांतीयांना रासायनिक खतं विक्री करतात परंतु पुराव्याअभावी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. काही रासायनिक खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची नावे समोर आली असून तपास सुरू आहे तपासानंतर पुरावा आढळल्यास त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल असे अधिकारी सांगतात आता या दुकानदारावर कोणते कारवाई होते हे पहा न महत्वाचे ठरणार आहे. 

Read More