Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

खबरदार ! बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर

New rules for bullock cart racing : सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

खबरदार ! बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर

मुंबई : New rules for bullock cart racing : सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे. (Maharashtra Government announces new rules for bullock cart race)

सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे होत आहेत. मात्र, आता नियमावलीनुसार बैलगाडा शर्यतीचं आयोजन करावं लागणार आहे. आता नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई आणि अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याआधी पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे.

तसेच नव्या नियमानुसार बैलांचा छळ करणे, त्यांना उत्तेजक द्रव्य देण्यास मनाई करण्यात आली आहे. एक हजार मीटर अंतराचीही अटही ठेवण्यात आली आहे. अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता, बैलांना उत्तेजक द्रव्य-मद्याचा वापर न करणे अशा स्वरुपाची नियमावली बैलगाडा र्शयतीसाठी शासनाने लागू केली आहे.

Read More