Ladki Bahin Yojna: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली, साधारण 2 कोटी 11 लाख 860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. दरम्यान महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी सरकारने गिफ्ट दिले आहे. फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या सामनी प्रक्रियेत अपात्रांच्या संख्येत भर पडली आहे. या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास 2 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळं या फेब्रुवारीचा हफ्ता या महिलांच्या खात्यात येणार नसल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पात्र महिलांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.
लाडक्या बहिणीला महिला दिना निमित्त सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे. 8 मार्चला महिला दिनाला 2 महिन्यांचे लाडकी बहिणी योजनेचे हप्ते मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हफ्ते एकत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत. अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी 11.8% आहेत तर विधवांचा वाटा 4.7% आहे. घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला एकत्रितपणे 1% पेक्षा कमी लाभार्थ्यांचे आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी 0.3%, सोडून दिलेल्या महिला 0.2% आणि निराधार महिला 0.1% आहेत. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी 29% होती. त्यानंतर 21-29 वयोगटातील गट 25.5% होता तर 40-49 वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी 23.6% होता. खरंच, 78% लाभार्थी 21-39 वयोगटातील होते आणि 22% लाभार्थी 50-65 वयोगटातील होते. 60-65 वयोगटातील लाभार्थींचा वाटा जवळजवळ 5% होता. "60-65 वयोगटातील जवळजवळ 5% महिलांना लाभ मिळाला आहे.
विरोधकांना सुरुवातीपासून ही योजना खुपते आहे. विरोधकांना त्यामुळे नैराश्य आलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आहे, मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यात शेवटाला आपण तो हफ्ता देऊ, असे अदिती तटकरे म्हणाल्या. यासंदर्भातली यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रत्येक जिल्ह्यात महिलांनी एकत्र येत आर्थिक सक्षम व्हावं, असे त्या म्हणाल्या.
रायगडसंदर्भातली परंपरा खंडीत होणार नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणात पोलीस तपास करत आहेत. यात कारवाईदेखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलेलं असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या. लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता महिलांना 8 मार्च रोजी मिळणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेचा हफ्ता दिला जाणार आहे. मार्च महिन्याचा हफ्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटाला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.