Uddhav Thackeray Oppose hindi compulsory: महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होतोय. या विषयावर मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठींबा दिलाय. 7 जुलै रोजी आझाद मैदानात हे आंदोलन होणार आहे. यात सर्व मराठी कलाकार, खेळाडू, साहित्यिक यांनी सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय.
आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी संजय राऊत विनायक राऊत हजर होते. हिंदीसक्तीचा विरोध आम्ही त्यांच्यासमोर मांडला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. 19 जूनला जाहीर सभा घेणार असून हिंदी सक्तीच्या निर्णयाची प्रतिकात्मक होळी करणार असल्याचे दीपक पवार म्हणाले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे येणार आहेत. 7 जूलै रोजी हुतात्म्यांना अभिवादन करुन आंदोलन केले जाणार आहेत. विधीमंडळातील सर्व आयुध वापरुन ठाकरेंचा पक्ष मदत करेल. संस्कृतिक कारस्थानाच हत्यार म्हणून वापरल जात असेल तर याचा आम्हाला विरोध आहे. आम्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटलो. दादा भुसे सादरीकरण करणार आहेत. त्या समोर आम्हीदेखील उपसादरीकरण करु. ठाकरेंचा पक्ष आमच्या सोबत असेल तर या आयएएम लॉबीला रोखण्यास यश येईल, दीपक पवार म्हणाले.
कारण नसताना हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्रद्रोही सरकारने लादलाय. यासाठी सर्व पक्ष एकत्र येतायत. यांना महाराष्ट्रावर यांची हुकूमशाही लादायचीय म्हणून यांना शिवसेना संपवायची आहे. आम्ही कोणत्या भाषेच्या विरोधात नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन होईल. मी माझ्या राज्यात हिंदी सक्ती होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले तर हा विषय इथे संपेल. पण बटेंगे तो काटेंगे करुन विषाचा खडा टाकला जातोय. हिंदीला आमचा विरोध नाही. हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. हिंदी चित्रपट सृष्टीला महाराष्ट्राने जोपासलं. अनेक कलाकार मुंबईत आले आणि मोठे झाले. आम्हाला हिंदीचं वावडं नाही पण एक विधान, एक प्रधान हे सर्व एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु आहे. आता भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे गद्दार तिकडे आहेत त्यांना बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे सांगण्याची वेळ आलीय. हिंदी सर्वांना येते. आरएसएसचे भैया जोशी म्हणाले घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं. मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्ती केली. त्याविरोधातही लोकं कोर्टात गेले होते. मराठी सक्तीचं पुढे या सरकारनं काय केलं? मराठीचं दालन चौपाटीवर करायचं ठरवलेलं पण ती जागा सरकारने बिल्डरच्या घशात टाकली आहे. मराठी भाषा भवनाच उद्घाटन मी केलं होतं आता अजित दादा गप्प का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. कोणतं सादरीकरण पाहण्याची गरज नाही. चित्रपट सृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक, सर्वांनी उतरायला हवे. भाजपमधील अस्सल मराठी माणसांनीदेखील या आंदोलनात सहभागी व्हाव, ही विनंती मराठी माणसू म्हणून करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.