Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्र सरकार मोठ्या संकटात! संजय शिरसाट यांचा खळबळजनक कबुली

महाराष्ट्र सरकार मोठ्या संकटात असल्याची खळबळजनक कबुली शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. झी 24 तासच्या  टू द पॉईंट मुलाखतीत संजय शिरसाट यांनी ही कबुली दिली आहे. 

महाराष्ट्र सरकार मोठ्या संकटात! संजय शिरसाट यांचा खळबळजनक कबुली

Sanjay Sirsat on Mahayuti Sarkar : राज्यात महायुतीचे सरकार आहे. सरकार मोठ्या संकटात असल्याची खळबळजनक कबुली शिवसेना नेते तथा समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.  झी 24 तासच्या  टू द पॉईंट मुलाखतीत संजय शिरसाट यांनी ही कबुली दिली आहे. हे संकट नेमकं काय आहे? याचा सरकारवर काय परिणाम होऊ शकतो. याचा संपूर्ण खुलासा संजय शिरसाट यांनी मुलाखतीत केला आहे.  झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी या रोख ठोक मुलाखीत दिली आहेत.  

महायुती सरकारसमोर असलेले संकट हे आर्थिक संकट आहे. सरकार आर्थिक संकटात असल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या घोषणांच्या पूर्तता करणे. योजना सुरु ठेवण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. या योजना सुरु ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. यामुळे सर्व योजना सुरु ठेवण्यासाठी, सर्व योजनांची पूर्तता करण्यासाठी निधीची गरज आहे. यामुळे काम करताना अडचणी येत आहेत. यामुळेच सरकार आर्थिक संकटात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. 

निधी वाटपावपरुन सुरु असलेल्या वादावर देखील संजय शिरसाट यांनी भाष्य केले. निधी देत असल्याचा आरोप होता. मात्र, आता  निधी उपलब्ध करुन देत आहे. आरोपांवरुन संजय शिरसाटांचा स्वकियांवरच निशाणा साधला. 'जाहीर बोलण्याचे साईड इफेक्ट भोगावे लागले' 'जाहीर बोलण्यामुळं मित्रपक्षांकडूनही त्रास होतो अशी टू द पॉईंट कबुली संजय शिरसाटांनी दिली. आरोपांवरुन संजय शिरसाटांचा मित्रपपक्षांनाही चिमटा काढला. 

दरम्यान,  आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकऱणी आमदार संजय गायकवाडांविरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय. संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. आंबलेली डाळ दिल्यानं आमदार संजय गायकवाडांचा संताप झाला आणि त्यांनी थेट कॅन्टीन चालकाला मारहाण केलीय. त्यावरून वाद झाल्यानंतर अखेर संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल झालाय

Read More