Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उद्या गुढीपाडवा साजरा करण्याआधी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना वाचा

 गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

उद्या गुढीपाडवा साजरा करण्याआधी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना वाचा

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकार राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. एमपीएससी, दहावी, बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्यायत. दरम्यान या आठवड्यात  गुढीपाडव्याचा सण आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक रस्त्यावर उतरतात. या पार्श्वभुमीवर गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

गहविभागाच्या सुचनांनुसार पाडवा सण सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत साजरा करावा. पाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यास बंदी राहील. सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असणार आहे. 

गुढीपाडवा साजरा करताना पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. पाडव्यानिमित्त प्रशासनाच्या पूर्व परवानगीने आरोग्य शिबिरे आयोजित करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार ठेवा, तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. जालना महाराष्ट्राला दररोज 6 लाख लसींची पूर्तता झाल्यावर राज्याचा वेग वाढवता येईल असेही ते म्हणाले. विद्युत शव दाहिनी प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करण्याबरोबरच ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारणे, रेमडिसीवीर वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येण्याबाबत निंर्णय झाल्याची माहिती टोपे यांनी दिलीय.

लसीं मिळत नाही याची आम्हाला खंत आहे असंही ते यावेळी म्हणाले. यापुढे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट तयार होणार असून त्यातूनच ऑक्सिजनची गरज भागवली जाईल असंही त्यांनी सांगितलं.10 वी आणि 12 वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जीव वाचवण्यासाठी असे निंर्णय घ्यावे लागतात असं सांगत त्यांनी या निंर्णयाच स्वागत केलं.

Read More