Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येचं भीषण वास्तव, दिवसाला 'इतक्या' शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Maharashtra Farmer Suicides: राज्यात वर्षभरात 2 हजार 706 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. धक्कादायक बाब म्हणजे दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करताहेत.

महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येचं भीषण वास्तव, दिवसाला 'इतक्या' शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Maharashtra Farmer Suicides: राज्यातील शेतकरी आत्महत्येचं भीषण वास्तव समोर आलंय. राज्यात वर्षभरात 2 हजार 706 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. धक्कादायक बाब म्हणजे दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करताहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाने विधानपरिषदेत ही लेखी माहिती दिलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

 शेतकरी आत्महत्याचं भीषण वास्तव

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचं भीषण वास्तव समोर आलंय.. वर्षभरात 2 हजार 706 शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आपलं जीवन संपवलंय. धक्कादायक बाब म्हणजे रोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय.अमरावती विभागात आत्महत्यांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. वर्षभरात अमरावती विभागात 1 हजार 69 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय.

सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम 

महाराष्ट्रात रोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. वर्षभरात 2 हजार 706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं.अमरावती विभागात सर्वाधिक 1 हजार 69 आत्महत्या  तर छत्रपती संभाजीनगर विभागात 952 आत्महत्या झाल्या. मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भात विधानपरिषदेत लेखी माहिती दिली. शेतकरी आत्महत्या या पूर्णपणे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम असल्याची टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलीय.

सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्यानं पाहण्याची गरज

राज्यातील हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या मागची ही संकटांची मालिका काही संपायचं नाव घेत नाहीय. शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद सरकारकडून केली जातेय.मात्र खरंच हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताहेत का? महाराष्ट्रासारख्या राज्यात जर दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या होत असतील तर ही चिंता वाढवणारी बाब आहे.त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झालीय.

Read More