Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जायकवाडी धरण कोण पोखरत आहे?

जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटच्या डेंजर झोनमध्ये वाळू उपसा सुरू असल्यांचे पुढे आले आहे.  

जायकवाडी धरण कोण पोखरत आहे?

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटच्या डेंजर झोनमध्ये वाळू उपसा सुरू असल्यांचे पुढे आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा वाळू उपसा सुरु आहे. धरणाच्या गेट क्रमांक एक जवळ पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामासाठी वाळू उपसा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संबंधित ठेकेदारांना तहसील प्रशासनाकडून केवळ पाटबंधारे विभागाच्या एका पत्रावर परवानगी घेतली आणि वाळू उपसा सुरू केलाय. महत्वाचं म्हणजे धरणाचा हा भाग अतिसंवेदनशील समजला जातो. पाटबंधारे विभागानं इथं कशी परवानगी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे. जायकवाडी धरण हे मातीचे धरण आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या उत्खननामुळे धरणाच्या भिंतीला धोका होण्याची शक्यताय तो ही नाकारता येत नाही. शासकीय कामासाठीच हा उपसा असला तरी धरणाच्या दरवाजासमोर नको अशी चर्चा आहे. 

Read More