Agriculture Department: महाराष्ट्राचं कृषिमंत्रिपद म्हणजे काटेरी मुकुट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीये. ज्या राजकीय नेत्याकडं कृषिमंत्रिपद जातं त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात. त्या नेत्याचं राजकीय भवितव्य दोलायमान होत असल्याची चर्चा सुरू झालीय.
कोकाटेंच्या खात्यात झालेला बदल हे त्याचं कारण ठरलंय. काय आहे नेमका हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्रात कृषीखात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.मात्र गेल्या दीड दशकात याच कृषीखात्याच्या मंत्र्यांमागे वादाचं ग्रहण लागलंय.ज्याच्याकडे कृषी खात्याचा पदभार जातो तो मंत्री वादाच्या भोव-यात अडकतो, हा इतिहास आहे.माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषीखात्याचा पदभार होता.आधी सततची वादग्रस्त वक्तव्यं आणि नुकताच रमी खेळतानाचा कोकाटेंचा व्हीडिओ व्हायरल झाला.आणि कोकाटेंना कृषीमंत्रीपद गमवावं लागलं.एखाद्या वादामुळे कृषीखातं सोडावं लागणारे माणिकराव कोकाटे एकटे नाहीयेत.तर यापूर्वी अनेक नेत्यांना कृषीमंत्रीपदावर असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागलेला आहे.
2014 मध्ये एकनाथ खडसे कृषिमंत्री झाले.खडसेंवर वेगवेगळे आरोप झाल्यानं त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर एकनाथ खडसेंचे राजकीय करिअरच उतरणीला लागलं. 2019मध्ये दादा भुसे कृषिमंत्री झाले. 2022मध्ये शिंदे सरकारमध्ये त्यांना दुय्यम खातं मिळालं. 2022 मध्ये अब्दुल सत्तार कृषिमंत्री झाले. अब्दुल सत्तारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अब्दुल सत्तारांकडील कृषीखाते काढून घेतले. 2025च्या सरकारमधून सत्तारांना डच्चू मिळाला. 2023मध्ये धनंजय मुंडे कृषिमंत्री झाले. धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप झाले. धनंजय मुंडेंचं राजकारण अडचणीत आले. 2024मध्ये माणिकराव कोकाटे कृषिमंत्री झाले. वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं कोकाटे वादात सापडले. विधिमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला. दरम्यान या प्रकरणात माणिकराव कोकाटेंच्या.खात्यात बदल करण्यात आला
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झालेत. दरम्यान त्यावेळी अजित पवारांकडून कृषिमंत्रिपदाची ऑफर होती असा दावा मंत्री छगन भुजबळांनी केलाय... माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलानंतर भुजबळांनीही माहिती दिलीय.
दादांनी मला कृषीमंत्रिपदाची ऑफर दिलेली म्हणत कृषीखातं घेण्यास भुजबळांनी नकार दिला होता.कृषिमंत्र्यांनी कितीही सचोटीनं कारभार केला तरी वाद होतोच. एवढंच नव्हे तर त्यांचं राजकीय भवितव्यही डामाडौल झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळेच छगन भुजबळांसारखे अनेक नेते देखील कृषिमंत्रिपद नको रे भाऊ असंच म्हणत असतील.