Maharashtra Employment Opportunity: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत. दावोस येथे पहिल्याच दिवशी 5 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि बालासोर अलॉयज लिमिटेड यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. बालासोर अलॉयज ही जगातील अग्रगण्य उच्च-कार्बन फेरोक्रोम उत्पादक कंपनी आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने रिलायन्ससोबतही करार केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
ONE MORE BIG NEWS FOR MAHARASHTRA !!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 22, 2025
Maharashtra’s Mission @ #WEF25 Davos!
MoU 32
Signed between
Govt of Maharashtra & Reliance Industries Ltd.
Total investment: ₹3,05,000 crore
Employment: 3,00,000
Sectors: Petrochemicals, polyester, renewable energy, bioenergy, green… pic.twitter.com/7Ms1R01kA6
महाराष्ट्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 3 लाख 5 हजार कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली.अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जा, किरकोळ विक्री, आतिथ्य आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादन यासह विविध क्षेत्रांमध्ये 3 लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत ₹3,05,000 कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार, सुमारे 3 लाख रोजगार संधी...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
( दावोस | 22-1-2025)@wef @RIL_Updates#WEF25 #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra pic.twitter.com/ZfJLMbtiwP
यावेळी अनंत अंबानी यांनी विकसित भारताच्या उभारणीतील परिवर्तनकारी प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आर.आय.एल. नवीन भारताच्या उभारणीत योगदान देण्यास वचनबद्ध असल्याचे अनंत अंबानी यावेळी म्हणाले. महाराष्ट्राला भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या प्रयत्नाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. भारत लवकरच पहिली ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या या ऐतिहासिक गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनंत अंबानी यांचे आभार मानले.