Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अरे बापरे! एकाच माणसाला 500 वेळा साप चावला, आता डॉक्टर म्हणतात...

लातूरच्या एकाच माणसाला आतापर्यंत 500 वेळा साप चावला, उपचार करणारे डॉक्टर म्हणतात....

अरे बापरे! एकाच माणसाला 500 वेळा साप चावला, आता डॉक्टर म्हणतात...

विशाल करोळे, झी मीडिया, लातूर : लातूर (Latur) जिल्ह्यातल्या औसा इथून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या गावात एक अशी व्यक्ती आहे ज्याला आतापर्यंत एक दोन वेळा नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्त वेळ सापाने चावा घेतलाय. कदाचित या गोष्टीवर सामान्यांचा विश्वास बसणार नाही, पण खरी घटना आहे.

लातुरच्या औसा शहरातील रहिवासी 45 वर्षीय अनिल तुकाराम गायकवाड शेतमजुरी करत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. मात्र यांचं आयुष्य सापानीं खडतर करून टाकलं आहे. कारण आतापर्यंत तब्बल 500 वेळ सापाने चावा घेतल्याचा दावा अनिलने केला आहे. विशेष म्हणजे इतक्या वेळा साप चावूनही हा पठ्ठा आयुष्याच्या या शर्यतीत जोमाने टिकून आहे. 

शेतात शेतमजूर म्हणून काम करताना अनेकदा अनिल गायकवाडला सापाने चावा घेतला आहे. इतकंच नाही तर शहरात अनेक माणसांच्या गर्दीत असतानाही साप नेमका त्यालाच चावतो. गेल्या 10 ते 15 वर्षाच्या काळात किमान 500 वेळा अनिलला सापाने चावा घेतला आहे. धक्कादायक म्हणजे अनेकवेळा अनिलला ICU मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं आहे.

अनिल गायकवाड यांच्यावर आ पर्यंत डॉ सच्चिदानंद रणदिवे यांनी किमान 150 पेक्षा जास्त वेळा उपचार केले आहेत. डॉक्टरांनाही अनिल यांनाच साप का चावतो याच मोठं आश्चर्य वाटतं.

एकाच व्यक्तीला अनेक वेळा सर्पदंश होतो, ही खरच आश्चर्यकारक घटना आहे. 

Read More