Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

समृद्धीचा विस्तार होणार; नागरिकांचा प्रवास एका तासांत होणार, कुठून ते कुठपर्यंत असेल नवीन महामार्ग?

Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. लवकरच आणखी एक महामार्ग सेवेत येणार आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास एक तासांत होणार आहे, 

समृद्धीचा विस्तार होणार; नागरिकांचा प्रवास एका तासांत होणार, कुठून ते कुठपर्यंत असेल नवीन महामार्ग?

Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा लवकरच आणखी विस्तार होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-समृद्धी महामार्गाला वाढवण बंदर जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान 118 किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत 85.38 किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान 118 किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे वाढवण-इतगपुरी प्रवास केवळ एका तासात करता येणार आहे. या प्रकल्पाच्यादृष्टीने एमएसआरडीसी लवकरच एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे.  प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सोविल कन्स्लटन्सी फर्म या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून. या कंपनीकडून लवकरच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

देशातील सर्वात मोठे बंदर पालघरमधील वाढवण येथे विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात असून, या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम शक्य तितक्या लवकर मार्गी लागावे यासाठी एमएसआरडीसी प्रयत्न करत आहे. आता चारोटी-इगतपुरीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत आहे. एकदा का आराखडा तयार झाला की प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर लवकरच नागरिकांना या महामार्गावर प्रवास करायला मिळणार आहे. 

वाढवण कुठेय?

वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.  वाढवण बंदराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. पालघर जिल्ह्यात हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोल असं देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर इथं येऊ शकतील. तसंच ते कंटेनर लोड-अनलोड करता येतील. समुद्रात 1,448 हेक्टर जागेवर भराव टाकून बंदराची उभारणी केली जाणार आहे. 

Read More