Maharashtra Tukdebandi Law: महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात येणारे काही महत्त्वाचे निर्णय चर्चेचा विषय ठरत असून, नागरिकांच्या दृष्टीनं या निर्णयांमुळं होणारा फायदासुद्धा सध्या केंद्रस्थानी असल्याचं स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान तुकडा बंदीचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनंसुद्धा महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात तुकडा बंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला असून, तालुका क्षेत्रात जिथे जिथे रहिवासी क्षेत्र झालं आहे त्या रहिवासी क्षेत्रात तुकडा बंदी कायदा निरस्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील या तुकडा बंदी कायदा रद्द होण्याच्या धोरणामुळं राज्यातील 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या प्लॉट धारकांना फायदा होणार असून, राज्यात ५ लाखांहून अधिक कुटुंबांना त्याचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सदर बदलांसंदर्भातील नोटिफिकेशन निघणार असून, 15 दिवसांत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियमावली तयार होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.