Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.   

ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला उल्लेखनीय यश मिळालं आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हाच विजयी रथ पुढे नेण्याचा मानस महायुतीनं बाळगलेला दिसत आहे. याच धर्तीवर सध्या विविध राजकीय धोरणं आखली जात आहेत. काही धोरणांची पुनर्बांधणी करत नव्यानं रणनितीसुद्धा आखली जात आहे. एकंदरच राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघत असल्याची स्पष्ट चिन्हं आता दिसू लागली आहेत. 

पक्षपक्षांतरं, नव्यानं नेतृत्त्वाची निवड या आणि अशा अनेक गोष्टींसाठी नेतेमंडळींच्या भेटीगाठींनाही आता वेग आला आहे. एकिकडे या संपूर्ण प्रक्रियांमध्ये महायुतीची सरशी दिसत असताना दिसरीकडे मविआ, त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र अनपेक्षित हादरा बसण्याची चिन्हं आहेत. इथं ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलेली असतानाच तिथे शिंदे गटानं 'ऑपरेशन टायगर'ची पकड आणखी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे 6 बडे नेते उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात येणं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : उत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार? 

भेटीगाठींनी वाढवली चर्चा... 

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुंबईत हे दोन्ही नेते एकनाथ शिंदेंना भेटले. यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. तर महाविकास आघाडीचे सहा नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महादेव बाबर, सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे, तसंच काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे हेही शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. तेव्हा आता सूत्रांच्या या वृत्तात नेमकं किती तत्थ आणि कोणते नेते नव्या वाटांचे वाटसरु होत राजकाणाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नेते आणि त्यांचे पक्ष 

  • रविंद्र धंगेकर, कॅाग्रेसचे माजी आमदार 
  • महादेव बाबर, ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसर 
  • रमाकांत म्हात्रे, कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर
  • सुभाष बने, संगमेश्वर माजी आमदार ठाकरे गट 
  • गणपत कदम, रत्नागिरी चे माजी आमदार ठाकरे गट 
  • चंद्रकांत मोकाटे, कोथरूड चे माजी आमदार ठाकरे गट
Read More