Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड! उद्धव ठाकरे पक्षातील 1500 सदस्यांनी एकावेळी पक्ष सोडला आणि...

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे पक्षातील 1500 सदस्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड! उद्धव ठाकरे पक्षातील 1500 सदस्यांनी एकावेळी पक्ष सोडला आणि...

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील 1500 सदस्यांनी एकचवेळी पक्ष सोडला आहे. या सर्व सदस्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत हा भव्य प्रवेश झाला. 
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी पक्षबदल केले आहेत. अशातच . शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे. 

हे देखील वाचा.... महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव पुन्हा चर्चेत 

अशातच भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.  शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष  प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक कार्यपद्धतीमुळे अनेक जण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे प्रवेश करणाऱ्यांचे एक प्रकारे बुकिंग सुरू झाला आहे असं विधान कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. येत्या काळात कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटप्रमुख शारंगधर देशमुख यांच्यासह अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. देशमुख हे काँग्रेसमधील अनेकांना घेऊन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने क्षीरसागर यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

 

Read More