Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिंदेंचे मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 

शिंदेंचे मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

Bharat Gogawale Viral video : रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भरत गोगावले मांत्रिकासोबत दिसत आहेत. या व्हिडिओद्वारे सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप केला आहे. या व्हिडिओमुळे   महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

रोहयो मंत्री भरत गोगावलेंवर आणखी एक व्हिडिओ ब़ॉम्ब टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत मोरे यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकला होता. त्यानंतर आता मित्रपक्ष राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी नवा व्हिडिओ टाकून गोगावलेंना धक्का दिला. या व्हिडिओबाबत भरत गोगवले यांनी प्रतिक्रिया दिली. अघोरी पूजेचे सर्व आरोप भर गोगवले यांनी फेटाळले आहेत. अशा प्रकारची कोणतीही पूजा केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. घरी अनेक सांधू संत भेटायला येतात. त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचा दावा भरत गोगवले यांनी केला आहे.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडिओ समोर आणला होता. या व्हिडिओत भरत गोगावले बगलामुखी यज्ञ करत असल्याचा दावा मोरेंनी केला होता. राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी उज्जैनच्या पुजा-यांना बोलावून हा यज्ञ केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता..
दरम्यान,  मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या अघोरी पूजेच्या आरोपाचं बुमरँग झाल्याचं पाहायला मिळतंय. या वादात मंत्री नितेश राणेंनी उडी घेतलीय... अघोरी पूजा काय असते हे मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर विचारा असं म्हणत नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलीय. तर अघोरीपूजेत उद्धव ठाकरे तज्ज्ञ असल्याचं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.

 

Read More