Maharashtra Politics : पुण्यातील उद्योग-धंद्यांमध्ये वाढलेल्या राजकीय दादागिरीवरून चांगलंच राजकारण पेटल आहे. उद्योगांमध्ये राजकीय दादागिरी वाढत असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आली. विविध पक्षांचं नाव घेऊन पुण्यात दादागिरी सुरू आहे. दरम्यान ही दादागिरी मोडून काढणार असल्याचा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. तर दादागिरी सुरू हे माहिती असून फडणवीसांनी अॅक्शन का घेतली नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.
पुण्यात कुणाची दादागिरी सुरू आहे? याच्या चौकशीची मागणी रोहित पवारांनी केली आहे. तसंच दादागिरी सुरू असताना सरकार करतंय असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान दादागिरी करणा-यावर कारवाईच्या सूचना दिल्याचं स्पष्टीकरण विरोधकांच्या आरोपांवर अजित पवारांनी दिले.
काल पुण्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली होती. काही लोक दादागिरी करत नाहीत. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वात ते दिसतं असं मिश्किल देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.. दरम्यान फडणवीसांच्या या विधानानंतर रोहित पवारांनी देखील एक विधान करत दादा-फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील उद्योग धंदे इतर राज्यात जात असल्याची कबुली खुद्द अजित पवारांनी दिली होती. तसंच आता उद्योग धंद्यांमध्ये वाढत्या राजकीय दादागिरीमुळे देखील पुण्यात उद्योग येत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय दादागिरीवर लगाम लावण्यात सरकारला यश येणार का याकडे आता लक्ष लागलं आहे.