Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? दावोसमधून उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले, '15 दिवसांत...'

Maharashtra Political News: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचा दावा केला आहे. 

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? दावोसमधून उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले, '15 दिवसांत...'

Maharashtra Political News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत. तिथूनच त्यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे. 

उदय सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर असून त्यांनी दोन मोठ्या घडामोडींची माहिती त्यांनी दिली आहे. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक नोंदवली आहे. त्यापुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे चार आमदार आणि तीन खासदारांनी मागील 15 दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काँग्रेसचे 5 आमदार शिंदेंना भेटून गेलेत, असा दावा सामंतांनी केला आहे. 

येत्या तीन महिन्यांत ठाकरे पक्षाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील होतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. UBT आणि काँग्रेस फुटणार असून येत्या तीन महिन्यात अनेक आमदार आणि महत्वाचे नेते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारणार, असल्याचे सामंतांनी म्हटलं आहे. 

Read More