Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. त्यातच याविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.
राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर शिवसेना UBT आणि मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक वक्तव्य करत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा कायम ठेवली होती. त्यातच दोन दिवसांपासूर्वी उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केले. उद्धव यांचं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जातंय.
राज ठाकरेंनी पहिली टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्युनिअर ठाकरे आदित्य आणि अमितही या युतीसाठी सकारात्मक असल्याचा पाहायला मिळालं. मात्र पुढलं पाऊल कोण टाकणार असी चर्चा असताना ठाकरेंच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. आता या मनोमिलनामध्ये त्यांना कितपत यश येतंय ते पाहणं महत्वाचं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही बंधूंकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ठाकरेंची मामा चंदूकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळताहेत. गेली अनेक वर्ष राज आणि उध्दव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं चंदू मामा यांनी म्हटलंय.