Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

Maharashtra Politics : "कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे".  उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल  झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली. 

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी मांडलले्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीतील काही नेते भाजपसोबत जाणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'सामना'वृत्तपत्रातील रोठ ठोक या विशेष सदरामध्ये संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत (Maharashtra Politics ). 

"कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे".  उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल  झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली. 

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका मांडली आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे संजय राऊत म्हणाले.   अजित पवारांवर आमचा विश्वास आहे. अजित पवारांच्या खांद्यावर महाविकास आघाडीची धुरा आहे, अस देखील संजय राऊत म्हणाले.  

अजित पवार यांचा खुलासा

दरम्यान अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती.  अमित शाहांशी भेट झाल्याची चर्चा अजित पवारांनी फेटाळली आहे. आपल्याविषयी एवढं प्रेम गेल्या काही दिवसांत का ऊतू चाललंय असा सवाल पवार यांनी उपस्थित  केला आहे. 

अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ

विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असं मोठं विधान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले होते. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावरून मंत्री दादा भुसेंना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा भुसेंनी हे विधान केले. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली आहे. भाजपविरोधात अजित पवार नरमाईची भूमिका घेताना दिसतायत अशाही चर्चा जोरदार आहेत.  तेव्हा आता राज्यात कोणता राजकीय भूकंप होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यमुळे चर्चेला उधाण आले आहे. 

Read More