Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आह. सर्वाच राज्यांना पावासाने झोडपून काढले आहे. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. या जिल्ह्यात पावसाने 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.
बुधवारच्या रात्री अकोला शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे मे महिन्यात 24 तासांत झालेल्या सर्वाधिक पावसाने 82 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहेय. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 28 मे 1943 रोजी अकोल्यात 24 तासांत 44.7 मिमी पावसाची नोंद झाली होती. जो आतापर्यंतचा उच्चांक मानला जात होता. मात्र, बुधवार, 21 मे रोजी रात्री 8 वाजेपासून सुरु झालेला पाऊस गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरु होता. यादरम्यान शहरात तब्बल 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपलं आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 103.99 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस पडला. गुहागर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 190.40 मीलिमीटर पाऊस पडला. त्या खालोखाल लांजा तालुक्यात 128 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर रत्नागिरी तालुक्यात 124.11मिलीमीटर एवढा पाऊस पडला. राजापूर तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर मध्ये 116.45 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यात 94.28 मीलिमीटर पावसाची नोंद झाली. चिपळूण तालुक्यात 99.22 मीलिमीटर पावसाची नोंद झाली. दापोली तालुक्यात 105.71 मीलिमीटर पावसाची नोद झाली. सर्वात कमी पावसाची नोंद मंडणगड तालुक्यात 27.75 मीलिमीटर इतकी झाली.
तर, गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोल्हापूर शहरातील कसबा बावडा इथला राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे कसबा बावडा ते वडणगे हा रस्ता आता वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आला आहे.