Maharashtra Rain : पावासाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. मुंबईच्या वेशीवर असेलल्या कल्याण, बदलापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग सोंमर आली आगे. कल्याण बदलापूरमध्ये तुफान पाऊस पडला आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
अवघ्या चार तासात बदलापुरात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसंच पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था पालिका प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
पावसात कोणत्याही प्रकारची जीवित तसच वित्तहानी झालेली नाही. सकाळच्या सुमारास भुयारी मार्गात अडकलेली कार तातडीनं क्रेनच्या सहाय्यानं हटवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. हवामान विभागाने दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रायते गावा जवळून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळी अचानक वाढ झाली आहे. उल्हास नदीचे पाणी पुलापर्यंत आले आहे. अशा प्रकारची परिस्थिती पहिल्या पावसात प्रथमच निर्माण झाली असल्याचे स्थानिकांच म्हणणं आहे. सध्या पाऊस थांबला असून देखील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असतानाचे चित्र दिसून येत आहे.
उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आला आहे. यामुळं कल्याण तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातू कल्याण मुरबाड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. कल्याण नगर मार्गावरील मुरबाड रोड रायते येथील पुलावरून उल्हास नदीला पाणी लागण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण-मुरबाड मार्ग बंद करण्यात आला आहे. अद्याप पुलावरून पाणी गेले नसले तरी वाहतूक पूर्णपणे थांबवली असून वाहन चालकाला त्रास होऊ नये म्हणून ही वाहतूक टिटवाळा मार्गे वळवण्यात आली असल्याची माहिती कल्याण जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली.